Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Tendernama
मुंबई

Mumbai: ..तर बोगस कागदपत्रे देणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करू

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मिठी नदीच्या (Mithi River) वेगवेगळ्या भागातील गाळ काढण्याकरिता ३ कामांसाठी टेंडर (Tender) मागविण्यात आले होते. यामध्ये नदीतील आणि तिच्या टेल टनेल आणि त्यांना जोडणारी पातमुखे (आऊटफॉल्स) यातील गाळ काढणे या दोन कामांसाठी एकाच कंत्राटदाराने (Contractor) टेंडर सादर केले होते. या टेंडरमध्ये सादर करण्यात आलेली कागदपत्रे खोटी असतील तर त्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेत दिली.

यासंदर्भात सदस्य ॲड. अनिल परब यांनी लक्षवेधीद्वारे हा विषय उपस्थित केला होता. या विषयावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सविस्तर तपशीलवार माहिती सभागृहाला दिली.

मिठी नदीच्या वेगवेगळ्या तीनपैकी दोन कामांसाठी या कंपनीने टेंडर सादर केली. परंतु टेंडरमधील अटीनुसार मूळ उत्पादक कंपनी / तंत्रज्ञान प्रदाता यांना अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा पुरवठा, देखभाल आणि प्रचालन करण्याचा किमान एक वर्ष इतका अनुभव असल्याची प्रमाणपत्रे सादर केली नसल्याने ही टेंडर अपात्र ठरविण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात ठेकेदार कंपनीने वेगळ्या कंपनीशी संबंधित दाखल केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे पडताळणीअंती आढळून आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.