Mumbai
Mumbai Tendernama
मुंबई

Mumbai : बापरे! 252 कोटींचा फ्लॅट अन् 15 कोटींची स्टॅम्प ड्युटी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : बजाज ग्रुपचे संचालक नीरज बजाज (Bajaj Group Director Niraj Bajaj)) यांनी दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील लोढांच्या मालाबार टॉवरमध्ये (Malabar Tower) वरच्या भागातील तीन मजले बुक केले आहेत. २५२ कोटी रुपयांत या ट्रिप्लेक्स फ्लॅटची (Triplex Flat) विक्री झाली आहे. या फ्लॅटची किंमत प्रति स्क्वेअर फूट १.४ लाख रुपये इतकी आहे.

उद्योगपती नीरज बजाज आणि मैक्रोटेक डेव्हलपर्स (लोढा ग्रुप) यांच्यात या फ्लॅटचा सौदा झाला आहे. गेल्या महिन्यात मुंबईच्या वरळी परिसरात उद्योगपती बी. के. गोयंका यांनी ३० हजार स्क्वे. फुटांचे पेंटहाऊस २४० कोटी रुपयांना खरेदी केले होते. गोयंका हे वेलस्पन ग्रुपचे अध्यक्ष आहेत. त्यावेळी हा करार देशातील सर्वात मोठा करार मानण्यात येत होता.

आता त्याहून मोठा हा सौदा बजाज आणि लोढा यांच्यात झाला आहे. फेब्रुवारीत झालेला करार हा तयार बिल्डिंगमधील पेंट हाऊससाठी झाला होता. आत्ता झालेला नवा करार हा बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगमधील फ्लॅटसाठी झाला आहे.

बजाज ग्रुपचे संचालक नीरज बजाज यांनी लोढांच्या मालाबार टॉवरमध्ये वरच्या भागातील तीन मजले बुक केले आहेत. या बिल्डिंगमधील फ्लॅटची किंमत प्रति स्क्वेअर फूट १.४ लाख रुपये इतकी आहे.

मालाबार हिलमध्ये ३१ मजली बिल्डिंगचे बांधकाम सुरू आहे. ही बिल्डिंग २०२६ मध्ये बांधून तयार होणार आहे. बजाज यांनी या बिल्डिंगमधील २९, ३० आणि ३१ वे मजले बुक केले आहेत. याचबरोबर ८ पार्किंगही त्यांनी खरेदी केले आहेत. सद्यस्थितीत बजाज हे पेडर रोडच्या माऊंड युनिक या बिल्डिंगमध्ये राहतात. या बिल्डिंगमध्ये वरचे दोन मजले बजाज यांच्या मालकीचे आहेत. ही इमारत ५० वर्षे जुनी आहे.

नव्या टॉवरमध्ये बजाज परिवाराला प्रायव्हेट रुफटॉपवर जाण्याची सुविधा असणार आहे. या रुफटॉपवर स्विमिंग पूलही असणार आहे. हा करार सोमवारी झाला असून, याची स्टॅम्प ड्युटी १५ कोटी रुपये आहे.