Shrikant Shinde
Shrikant Shinde Tendernama
मुंबई

Kalyan : पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 28 कोटी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कल्याण लोकसभा मतदार संघातील मलंगगड परिसर सुशोभीकरण, कांबा येथील पावशेपाडा तलाव आणि शिव मंदिर, दावडी येथे पक्षी अभयारण्य या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी २८ कोटींचा निधी मिळाला आहे. यासाठी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) राज्याच्या पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करत होते.

रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन या पायाभूत सुविधांसह मतदारसंघातील नागरिकांना समाधानाचे आयुष्य जगता यावे. त्यांना मनोरंजनाची साधने उपलब्ध असावीत. त्यांचा हॅप्पीनेस इंडेक्स वरचा असावा या हेतूने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी शहरात नाट्यगृह, क्रीडा संकुल, कला दालन, मंदिर परिसर सुशोभीकरण असे अनेक प्रकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हाती घेतले आहेत. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघात पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी खासदार डॉ. शिंदे प्रयत्नशील होते.

गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या श्रीमलंग गड या धार्मिक आणि पर्यटन स्थळी असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी त्यांनी पाणी योजना राबवण्यास सुरूवात केली. श्रीमलंग गडाचा पर्यटन विकासाअंतर्गत चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार श्री मलंगगडाच्या पर्यटनाच्या अंगाने विकास करण्यासाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात गडाकडे जाणाऱ्या पायऱ्या, येथे संरक्षक कठडे यांची उभारणी केली जाते आहे. या पायऱ्या काळ्या दगडात बांधल्या जात आहेत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दुर्गाडी स्थळाच्या विकासासाठी अशाच प्रकारे सुमारे पाच कोटी रूपयांचा निधी खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांनी पाठपुराव्याने प्राप्त केला. तर मतदारसंघातील पावशेपाडा आणि कांबा येथील तलाव आणि शिव मंदिराच्या परिसर सुशोभीकरणासाठी आठ कोटींची निधी उपलब्ध करण्यात आला आहे. नुकताच राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने डोंबिवली येथील दावडी डोंगरावर पक्षी अभयारण्य आणि जैवविविधता उद्यान विकसित करण्यासाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

असा निधी मिळणार -
-
श्री मलंग वाडी परिसर सुशोभीकरण करणे - १० कोटी
- मौजे कांबा येथे शासकीय जागेवर असलेल्या तलावाचे सुशोभीकरण करणे ता. कल्याण, ५ कोटी
- कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याचे डागडूजी करणे - ५ कोटी
- कांबा पावशेत येथील शिवमंदिर परिसर सुशोभीकरण करणे - ३ कोटी
- कल्याण तालुक्यातील डोंबिवली (दावडी) आणि भाल येथील पक्षी अभयारण्याचे सुशोभीकरण करणे - ५ कोटी