तगादा : पुणे - नगर रस्त्याचे 'ते' दुखणे कधी बरे होणार?

Nagar Road
Nagar RoadTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे-नगर रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी, अपुऱ्या सुविधा, रस्त्याची दुरवस्था व पादचारी मार्गावरील असुरक्षिततेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. (Pune Nagar Road Traffic News)

Nagar Road
Pune : पीएमपीची विद्यार्थ्यांसाठी लवकरच नवी सुविधा

या वाहतूक संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी महापालिका प्रशासन, वाहतूक नियंत्रण विभाग, पुणे शहर वाहतूक शाखेला दिले आहे.

येरवडा, शास्त्रीनगर, कल्याणीनगर, रामवाडी, विमाननगर, टाटा गार्डन, खराडी बायपास, जनक बाबा दर्गा, युवान आयटी पार्क, खराडी जकात नाका या परिसरामध्ये सिग्नल फ्री योजना अमलात आणली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढला असला, तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना प्रलंबित असल्याचे दिसून येते. याच पार्श्‍वभूमीवर आमदार पठारे यांनी या निवेदनाद्वारे काही उपाययोजनाही सुचविल्या आहेत.

Nagar Road
Pune : पुणे महापालिकेतून 'ती' फाइल कशी झाली गायब?

याशिवाय विमाननगर व चंदननगर येथील भुयारी मार्गांची स्थिती अत्यंत खराब झाली असून, या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी. या भुयारी मार्गामध्ये प्रकाशयोजना अपुरी असून, स्वच्छतेचा अभाव असल्याने नागरिकांना या मार्गाचा वापर करताना असुरक्षित वाटत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

आमदार पठारे म्हणाले की, वडगावशेरी मतदारसंघामधील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून प्रयत्नशील आहे. वाहतूक कोंडी फोडून सुरळीत वाहतुकीसोबतच सुरक्षित वाहतूक असणेही गरजेचे आहे. या मागण्यांचा विचार प्रशासन दरबारी होईल, ही खात्री आहे.

Nagar Road
Pune : 500 हून अधिक कंत्राटी कामगार कसे बनले नेत्यांचे ‘घरगडी’? नवा घोटाळा उजेडात

निवेदनात सुचविलेल्या उपाययोजना
- बीआरटी मार्ग काढल्यानंतर विस्कळित झालेला दुभाजक रस्त्याच्या मध्यभागी घेणे
- काही सेकंदाचे पादचारी सिग्नल यांची उभारणी
- दुभाजक सुरू होणाऱ्या ठिकाणी प्रतिबिंबित फलक
- प्रमुख भागांकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक, रस्ता मार्गदर्शक सूचना फलक
- वाहतूक नियंत्रणासाठी स्मार्ट सिग्नल यंत्रणा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com