तगादा : स्मार्टसिटी नागपुरातील लंडन स्ट्रीटवर कचऱ्याचे साम्राज्य

Nagpur London Street
Nagpur London StreetTendernama

नागपूर (Nagpur) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूर शहरात मोठा गाजावाजा करत बांधण्यात आलेल्या 'लंडन स्ट्रीट' या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. स्मार्टसिटी नागपूरमधील विकासाचे नवे मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडन स्ट्रीट परिसरात सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग, घाण, अर्धवट फूटपाथ पाहून लंडन स्ट्रीटच्या नावाने स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

Nagpur London Street
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसची वेळ बदलणार; कारण...

जयप्रकाशनगर येथे लंडन स्ट्रीटच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. 'लंडन स्ट्रीट' नावाने गाजावाजा करून या परिसरात सिमेंटचे रस्ते बांधण्यात आले. फूटपाथही तयार करण्यात आले. मात्र रस्त्यापेक्षा फूटपाथ मोठे झाल्याने पादचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या ठिकाणी बरेचदा दुचाकी-चारचाकी वाहनांचे अपघातही झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

लंडन स्ट्रीटच्या माध्यमातून या परिसरात काहीतरी वेगळे होईल, ज्या माध्यमातून रोजगार वाढतील आणि परिसराचे नाव नागपुरात होईल, असे सुरवातीला वाटले होते. परंतु आता अनेक समस्या जाणवत आहेत. हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. दिवसरात्र वाहने सुसाट गतीने धावत असतात. रोड अरुंद असल्याने अपघात वाढले आहेत. या भागात जवळपास दररोजच छोटे-मोठे अपघात होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

Nagpur London Street
Nashik : सारूळच्या वादग्रस्त खाणपट्ट्यांचे उत्खनन बंद

महापालिका पावती घेते, पण सुविधा देत नाही

व्यवसाय करण्यासाठी महापालिका प्रत्येक दुकानदाराकडून 400 रुपयांची पावती फाडते. मात्र, त्या मोबदल्यात सोयी-सुविधा काहीच मिळत नसल्याची तक्रार फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्या एका दुकानदाराने केली

या रोडच्या काठाला जयप्रकाशनगर चौकात ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत. ते बुजविण्यात न आल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात काहींनी झोन कार्यालयात तक्रारही केली. मात्र अजूनही खड्डे बुजविण्यात आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. जयप्रकाशनगर येथे मोठा गाजावाजा करीत लंडन स्ट्रीट म्हणून रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र सदोष कामामुळे स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यांपेक्षा फूटपाथ मोठे झाल्याने अपघात वाढले. याशिवाय इतरही समस्या वाढल्या आहेत.

Nagpur London Street
MSRTC: नव्याकोऱ्या ई-शिवनेरी बस जागेवरून हालेचनात; हे आहे कारण...

जयप्रकाशनगर ते हॉटेल रेडिसन ब्लू मार्गावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथ बांधण्यात आले. त्यावर अतिक्रमण तर झालेच, शिवाय जागोजागी बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. कुठे गट्टू लागले नाहीत, तर कुठे टाइल्स उखडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पायी चालणारे नागरिक जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय फूटपाथच्या बाजूला असलेली संरक्षक भींतदेखील तुटलेली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com