तगादा : 'त्या' मेट्रो स्थानकाजवळच 4 फुटांचे भगदाड; रस्ता बनला धोकादायक

Pune City
Pune CityTendernama
Published on

विश्रांतवाडी (Vishrantwadi) : येरवडा येथील मेट्रो स्थानकाजवळ चार फुटांचे भगदाड पडले असून, पादचाऱ्यांच्या दृष्टीने ते धोकादायक बनले आहे. मोठा अपघात वा अनुचित घटना घडण्यापूर्वी त्वरित ते भगदाड बुजविण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Pune City
Ajit Pawar : PM आवास योजनेसाठी 3752 कोटी; तर पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगतीसाठी...

येथील रहिवासी गणेश गायमुक्ते म्हणाले की, मेट्रो स्थानकाजवळच शाळा असून, शाळेतील विद्यार्थ्यांची सतत वर्दळ सुरू असते. दृष्टिहीन नागरिकही ये-जा करीत असतात. महाशिवरात्रीची या परिसरात भाविकांची प्रचंड वर्दळ असते. या भगदाडाचा अंदाज न आल्यास अनर्थ घडू शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी.

Pune City
Pune : राज्यभरात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तरी पीएमसीला अधिकारी मिळेना

यासंदर्भात पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता अक्षय मोढवे म्हणाले की, या परिसरात सतत अवजड वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे रस्ता खचून हे भगदाड पडले असावे. त्या परिसरात पाहणी करण्यात आली होती, त्या वेळी हे भगदाड नव्हते. त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com