तगादा : संभाजीनगरमधील 'त्या' विहिरीचे रूपडे पालटले; वार्ड अभियंत्यांमुळे...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको मुकुंदवाडी परीसरातील संघर्षनगरातील "त्या" गणेश विसर्जन विहिरीचे रूपडे पालटले असून धोकादायक विहिरीची दुरूस्ती झाल्याने रस्त्यालगतच खचलेल्या विहिरीमुळे वाहनधारकांसह वसाहतीतील नागरिक आणि चिमुकल्यासाठी निर्माण होणारी जीवघेणी समस्या आता कायमची सुटली आहे. यासंदर्भात ‘टेंडरनामा’ ने सातत्याने या गंभीर समंस्येला वाचा फोडल्याने झोन क्रमांक सहाचे नवनिर्वाचित प्रभाग अभियंता मधुकर चौधरी यांनी तातडीने रस्ते व मलनिःसारण वाहिनी विभागाचे कार्यकारी अभियंता भागवत फड, शहर अभियंता अविनाश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्याकडे  सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी २४ लाख ९२ हजार ६६९ रूपयाचे अंदाजपत्रक तयार करून त्यांनी तातडीने ई-टेंडर काढले. कामासाठी संबंधित विभागांची  प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळवली. याशिवाय प्रत्यक्षात लेखा विभागाची वित्तीय मान्यता घेऊन एका कंत्राटदाराकडून हे काम मार्गी लावले. सदर विहिर दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून आता विहिरीवर सुरक्षा जाळी व परिसरात पॅव्हरब्लाॅक बसवले जाणार असल्याने नागरिकांनी देखील चौधरी यांच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे.

Sambhajinagar
'त्या' मल्टिमॉडेल कॉरिडॉरसाठी मार्चमध्ये टेंडर; 55 हजार कोटींचे बजेट

"टेंडरनामा"च्या वृत्तमालिकेनंतर कर्तव्यदक्ष अभियंता मधुकर चौधरी यांनी रितसर इ. टेंडर काढुन एका कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत तातडीने विहिरीची दुरूस्ती केली. त्यासाठी तब्बल २४ लाख ९२ हजार ६६९ रूपयाचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र कंत्राटदाराने १९ टक्के बिलोने कंत्राट घेतल्याने यात महानगरपालिकेच्या लाखो रूपयाची बचत होऊन २३ लाखात हे काम मार्गी लागले. यात पहिल्या टप्प्यात विहिरीचे खोलीकरण, गाळ काढणे, विहिरीची स्वच्छता तसेच खालच्या जमीनस्तरापासून वरच्या लेव्हलपर्यंत गोलाकार काँक्रिट भिंत बांधल्या गेल्या आहेत. तसेच पाच फुटाचे संरक्षक कठडे बांधल्याने अपघाताचा धोका देखील टळला आहे. मात्र, याच मोठ्या कामात निधी आटल्याने पुढील टप्प्यात विहिरीवर लोखंडी सुरक्षा जाळी आणि विहिरीत ओट्याचे सुशोभिकरण करण्यासाठी प्रभाग अभियंता मधुकर चौधरी यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा केल्यानंतर याकामासाठी निधी देखील उपलब्ध करून घेतला  आहे. विहीरीची कायम स्वरूपाची दुरूस्ती करण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांनी चौधरी यांचे आभार मानले आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : नगरविकास योजनेतील 'या' रस्त्याचे काम निकृष्ट; ग्रामस्थांचा आरोप

सिडको एन-दोन मुकुंदवाडी परिसरातील वार्ड क्रमांक ८५ संघर्षनगरात श्री विसर्जनाच्या विहिरीत वर्षभर कचरा, निर्माल्य व घाण टाकली जाते. या विहिरीवर जाळीही नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे भर दाट वसाहतीत मुख्य चौकातील रस्त्यांना खेटूनच असलेल्या या विहिरीचे कठडे तुटल्याने खचलेल्या विहिरीमुळे त्यातील गाळात पडून लहान मुले, वाहनधारकांना केव्हाही धोका होऊ शकतो. या विहिरीत पडून जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. यासंदर्भात "टेंडरनामा" ने या जीवघेण्या विहिरीच्या दुरूस्तीबाबत महापालिका प्रशासनाला जागे केले होते. त्यानंतर नवनिर्वाचित प्रभाग अभियंता मधुकर चौधरी यांनी वृत्ताची दखल घेत तातडीने वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू ठेवत दुरुस्तीचे काम मार्गी लावले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com