तगादा : Akola-Akot रेल्वेची 'शकुंतला' होऊ नये; आता तरी रेल्वेचा प्रश्न मार्गी लागणार काय?

Akot
AkotTendernama

अकोला (Akola) : अकोला-अकोट रस्ता बंद पडल्यानंतर अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला. अकोट- अकोला मेमू गाडी सुरू झाली. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना पाहिजे त्या सुविधा अजूनही मिळत नाहीत. त्यामुळे अकोट-अकोला रेल्वेची शकुंतला होऊ नये. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तरी अकोला-खंडवा रेल्वेचा प्रश्न मार्गी लागणार काय, असा प्रश्न रेल्वे प्रवाशांनी उपस्थित केला.

Akot
Nagpur : महापालिकेचे क्रीडा संकुल; कंत्राटदार कमी कंत्राट घेऊन दुप्पट दर...

अकोट-अकोला धावणाऱ्या मेमू रेल्वेत लोकमत प्रतिनिधींनी प्रवाशांसोबत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संवाद साधला. यावेळी निवडणुका बरोबर दर पाच वर्षांनी येतात. मात्र, 7 ते 8 वर्ष होऊनही खंडवा-पूर्णा या रेल्वेचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी यांना मोठा फटका बसत आहे. चार राज्यांना जोडणारा हा अकोला-खंडवा मार्ग आहे. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा असून, लवकर पूर्ण झाल्यास परिसरातील उद्योगांना पोषक ठरेल. शिवाय परिसराची आर्थिक उलाढालसुद्धा वाढणार आहे. रेल्वे प्रशासनाने लक्ष घालावे अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया अकोट चे संतोष झुनझुनवाला यांनी दिली.

Akot
Mumbai Metro : अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राची मेट्रो-1 मधून का झाली गच्छंती?

रेल्वेत पोलिसांची हवी तैनाती : 

रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबर 2022 मध्ये अकोट-अकोला रेल्वे फेऱ्या सुरु केल्या. तिकीटही 10 रुपये घेत आहेत. परंतु, रेल्वेतून प्रवास करताना विशेषतः महिलांना असुरक्षित वाटत आहे. रेल्वेमध्ये तिकीट तपासणी करणारे नाहीत. त्यामुळे फुकटे प्रवासी इतर प्रवाशांना हैराण करून सोडतात. टवाळखोरांचे वर्तन हे त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या रेल्वे गाडीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीन रेल्वे पोलिस तैनात करायला पाहिजे. अकोट-अकोला मेमू रेल्वे फेऱ्या वाढविणे आवश्यक आहेत. सध्या सुरू असलेल्या रेल्वेचे वेळापत्रकामध्ये प्रवाशांच्या सोयीचे होईल अशा फेया वाढविण्यात याव्यात. अनेकांना जिल्हा रुग्णालयात व शासकीय कामाकरिता जाणे-येणे करावे लागते अशी माहिती बबन पांडे यांनी दिली. अकोट-अकोला या रेल्वेत प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनी व महिलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या रेल्वेत दोन डबे तरी महिलांकरिता आरक्षित करायला पाहिजे. तसेच अकोट रेल्वेस्थानकावर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशी मागणी अकोट च्या शीतल कुलट-तायडे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com