तगादा : 25 हजार ग्रामस्थांची रेल्वेगेटच्या कोंडीतून सुटका कधी होणार?

Tagada
TagadaTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी येथे भुयारी मार्ग उभारावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरली आहे. त्यानुसार ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्यामुळे  दोन वर्षांपूर्वी येथील ग्रामस्थांना आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत.‌ दुसरीकडे येथे भुयारी मार्ग झाला तर पावसाळ्यात पाणी साचेल, पाण्याचा निचरा होणार नाही, यासाठी येथे उड्डाणपूल तयार करावा, अशी देखील दुसरी मागणी समोर आली आहे. त्यामुळे येथे भुयारी मार्ग की, उड्डाणपूल असा पेच रेल्वे प्रशासनाकडे निर्माण झाला आहे. यातुन अद्याप कुठलाही मार्ग रेल्वे प्रशासनाने काढला नसल्याने गोकुळवाडीसह शेकडो गावकऱ्यांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Tagada
Sambhajinagar : बसस्थानकांचा विकास कधी होणार?; ना लोकप्रतिनिधींचे लक्ष, ना एसटी महामंडळाचे!

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील जालनारोडपासून गोकुळवाडी शिवारात रेल्वे गेट क्रमांक - ६९ आहे. जालना महामार्ग ते सोमठाणा ते राजुरा - जळगाव व मध्यप्रदेशकडे जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग-८ आहे.या मार्गावर बाजार गेवराई, गोकुळवाडी,सोमठाणा,दुधनवाडी, माळेवाडी,सागरवाडी,  डावरगाव, म्हसला, किन्होळा, विल्हाडी, गोकुळतांडा,खडकवाडी, राजुर , भोकरदन, पुढे जळगाव व मध्यप्रदेशकडे जाणारा मोठा महामार्ग आहे. गोकुळवाडी दरम्यान रेल्वे गेट क्रमांक - ६९  परिसरातून शेकडो गावांना जाण्यासाठी रेल्वे रूळांची अडचण येत आहे. रेल्वेची संख्या वाढल्याने सरासरी दर एक तासाला रेल्वेगेट बंद होत असून, यात प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांचायात समावेश आहे. रेल्वेने येथे भुयारी मार्ग उभारावा अशी मागणी या भागातील शेकडो ग्रामस्थांनी उचलून धरली आहे.रेल्वे प्रशासनाने या रेल्वे फाटकाच्या आजूबाजूला कंढारी,रामपूरवाडी, गाढे जळगाव, फेरण जळगाव, आदी ठिकाणी भुयारी मार्ग केले आहेत.‌ परंतु नंतर त्या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचत असल्याचे पाहुण सोमठाण्याचे संतोष नागवे पाटील, दुधनवाडीचे पद्माकर पडोळ, गोकुळवाडीचे प्रकाश भडांगे पाटील यांनी गोकुळवाडी रेल्वे फाटकावर भुयारी मार्ग केला, तर इतर ठिकाणासारखी परिस्थिती नको म्हणून येथे उड्डाणपुल उभारण्याची मागणी केली होती. त्या भागातून जाणाऱ्या नाल्याचे पाणी उपसण्याच्या मुद्यावरून येथे भुयारी मार्ग की उड्डाणपूल या वादात काम लांबणीवर पडल्याचे समोर आले आहे.

Tagada
Sambhajinagar : कामात अनियमितता, ठेकेदाराकडून 5 कोटींचा दंड वसूल

बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी रेल्वे गेट क्रमांक - ६९ रेल्वे फाटकामुळे गत कित्येक वर्षांपासून येथे वाहतुक कोंडीचा हा जटील  प्रश्न आहे. दिवसेंदिवस येथील शेतकऱ्यांसह विद्यार्थी , रुग्णांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. आसपासच्या २५ गावातील २५ हजार ग्रामस्थांना बदनापूर शहरात येतांना आणि पुन्हा घरी जाण्यासाठी रेल्वे फाटकाकडून जाणारा जुना रस्ता महत्वाचा आहे. परंतु गेल्या काही वर्षात रेल्वेची ये-जा वाढल्याने दर एक ते अर्धा तासांनी रेल्वे गेट बंद होत आहे. याचा मोठा परिणाम या भागातील वाहतूक ठप्प होण्यावर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे म्हणून त्या भागातील संतोष नागवे पाटील, पद्माकर पडोळ पाटील, जगदीश पडोळ‌ पाटील, फकीरबा नागवे यांनी ग्रामस्थांसह रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन भुयारी मार्ग मार्गी लावण्याची मागणी केली होती. या मागणीवर बराच खल होऊन  रेल्वेतील अधिका-यांनी  बैठक घेतली होती. त्यावेळी गोकुळवाडी भागातील ओढ्याचे जे पाणी आहे, ते इतरत्र वळवणे शक्य नाही. परंतु एक मोठा हौद बांधून त्यात या नाल्याचे पाणी सोडून नंतर ते पंपव्दारे ते उचलून इतरत्र वळवणे हाच पर्याय असल्याचा मुद्दा रेल्वे अभियंत्यांनी मांडला होता. येथील मुख्य रस्ता सद्यस्थितीत ७ मीटरचा आहे. आगामी काळात ९ मीटर सिमेंट रस्ता होणार आहे. परंतू इतक्या छोट्या रस्त्यावर उड्डाणपुल बांधने अशक्य असल्याचा तांत्रिक मुद्दा देखील समोर येत आहे. परंतु नंतर या मुद्याकडे रेल्वे प्रशासनाने गंभीरतेने न घेतल्याने रेल्वे फाटकाची अडचण कायम असल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com