तगादा : चारवर्षांनंतरही मूलभूत सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी

Water
WaterTendernama
Published on

पुणे (Pune) : जलवाहिनीचे जाळे हाकेच्या अंतरावर असूनदेखील हांडेवाडीतील गावठाणाव्यतिरिक्त इतर भागातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. येथील पाणीपुरवठा बंद नलिकेने करावा, अशी येथील महिलांकडून मागणी होत आहे.

Water
Devendra Fadnavis : मुंबईतील चाळी, झोपडपट्ट्यांचा क्लस्टर पुनर्विकास; स्वयं पुनर्विकासाच्या प्रीमियमचे व्याज 3 वर्षे माफ

महापालिकेत समावेश होऊन चार वर्षांचा कालावधी उलटला असतानाही ज्या प्रमाणात मूलभूत सुविधा मिळायला हव्या होत्या, त्या प्रमाणात मिळत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पूर्वी महापालिकालगतच भाग असल्याने येथे मोठी संकुले झाली. लोकसंख्या वाढल्याने मूलभूत सुविधांवरील भार वाढून त्या अपुऱ्या पडू लागल्या आणि पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

Water
तब्बल तीनशे एकरवर वसणार तिसरी मुंबई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लॅन

पूर्वी ग्रामपंचायत काळात कमी लोकसंख्या असल्याने जुन्या नळधारकांना बंद नलिकेने पाणी मिळत होते. ते अजूनही मिळतच आहे, परंतु गावठाणाव्यतिरिक्त इतर भागात जलवाहिनी नसल्याने टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीने दूरदृष्टीने त्याचवेळेस जलवाहिनीचे जाळे पसरविणे आवश्यक होते; परंतु तसे झाले नाही.

उन्हाळ्यामध्ये टँकरची भाववाढ होत असल्याने कौटुंबिक खर्चात वाढ होऊन आर्थिक घडी विस्कळित होत आहे. महापालिकेने बंद नलिकेने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, अशी मागणी येथील रहिवासी छाया दत्त, लीलाबाई जगदाळे, चंद्रकला कुंभार, रेखा नरवाडे, यशोदा कवठेकर, ज्योती धावारे आदींनी केली आहे.

Water
'भूमिअभिलेख'चा मोठा निर्णय; जमिनीची मोजणी आता...

हांडेवाडीचा भाग महापालिकेच्या जुन्या हद्दीलगत असल्याने येथे जलवाहिनीचे जाळे पसरविणे अवघड नाही. पालिकेच्या जुन्या हद्दीपर्यंत जलवाहिनी आहे. त्याच वाहिनीला जोड देऊन पाणी आणणे सहज शक्य आहे. इतर गावांच्या मानाने हे गाव लवकर टँकरमुक्त होईल, केवळ प्रशासनाने सकारात्मकता दाखवून काम करणे आवश्यक आहे.

- दीपाली कवडे, स्थानिक रहिवासी, हांडेवाडी

समान पाणीपुरवठा अंतर्गत समाविष्ट गावांसाठी नवीन तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर येथे जलवाहिनी संदर्भातील कामे करण्यात येतील. सध्या जुन्या वितरणवाहिनीने पाणीपुरवठा सुरू आहे.

- विलास मोराळे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com