तगादा : दोन वर्षे झाली फुटपाथची दुरावस्था कधी बदलणार?

Tagada
TagadaTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सरकारी अनुदान अंतर्गत हाॅटेल अमरप्रित ते एकता चौक शहानुरवाडी दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबी आणि पंधरा मीटर रूंद डीपी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुमारे पाच कोटी ३२ लाख ४६ हजार २१९ रूपये खर्च करून महापालिकेच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वीच झाले. दरम्यान दिडशे कोटीच्या योजनेत अंदाजपत्रकात डांबरीकरण व फुटपाथ असा उल्लेख असताना महापालिकेने या फुटपाथ दुरूस्तीकडे का कानाडोळा केला, हा संशोधनाचा विषय आहे.

Tagada
तगादा : 'जी-20'नंतर उपराजधानीत घाणीचे साम्राज्य

यानंतर महापालिकेने पंधराव्या वित्त आयोगातून शहरातील मुख्य मार्गावरील फुटपाथ व दुभाजक बांधणार असल्याचे जाहीर केले. शहरात दुभाजकांचे काम मार्गी लागत आहे. मात्र फुटपाथकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी हाॅटेल अमरप्रित ते एकताचौक या शहरातील अत्यंत वर्दळीच्या मुख्य मार्गावरील दुभाजकाचे काम झालेच नाही. या फुटपाथची पुर्णपणे दुरावस्था झाली असून, फुटपाथ असून अडचन नसून खोळंबा अशी स्थिती आहे.

Tagada
Sambhajinagar : 300 कोटी खर्चूनही बीड बायपासकरांचा प्रवास धोकादायक

टेंडरनामाकडे आलेल्या तक्रारीवरून प्रतिनिधीने बुधवारी या संपुर्ण दोन किमी रस्त्याची पाहणी केली. अनेक ठिकाणी फुटपाथवर बसवण्यात आलेले गट्टू निघून गेले आहेत ,रस्ताच्या मधोमध फुटपाथखालीच असलेल्या  गटार लाइनवर बसवलेल्या चेबंरची देखील काही ठिकाणी दुरावस्था झाली असून चेंबरची झाकणे गायब झाल्याने भगदाड पडलेली आहेत. नव्यानेच डांबरीकरण झाल्यानंतर देखील रस्ताच्या मधोमध अवकाळी पावसाचे पाणी साचत असल्याचे डाॅ. मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यानच्या कामात दुभाजकाच्या डागडुगीकडे देखील दुर्लक्ष करण्यात आल्याचे या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com