तगादा : अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे नागपुरात आरोग्याच्या समस्येत..

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) ः शहरात सर्दी, खोकला, तापाची साथ सुरू असून एका घराआड रुग्ण आहे. परंतु महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे नागपूरकरांच्या आरोग्याच्या समस्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. जुनी मंगळवारी भागात गेल्या तीन महिन्यांपासून सिवेज लाईनवरील चेंबर तुटले असून वारंवार विनवण्या करूनही नवे चेंबर तयार केले जात नसल्याने नागरिकांत संतापाची लाट आहे.

Nagpur
तगादा : औरंगाबादेत याचिकाकर्त्यांनाच पालिकेकडून काळ्या पाण्याची...

जुनी मंगळवारी हा शहराचा पुरातन परिसर असून येथील सिवेज लाईनही या भागातील घरांसारखी जीर्ण झाली आहे. त्यातच वारंवार सिवेज लाईनवरील चेंबर खचत आहेत. तीन महिन्यांपूर्वी घासबाजार या भागातील मुख्य मार्गावरील चेंबर तुटले. यातून सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकच नव्हे तर या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही नाकावर रुमाल ठेवावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com