तगादा : नागपुरातील आरोबीसाठी रेल्वे फाटक दीड महिन्यांपासून बंद

Manishnagar
ManishnagarTendernama

नागपूर (Nagpur) : मनीषनगर रेल्वे फाटक गेल्या दीड महिन्यांपासून बंद असल्याने स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांना मोठा फटका बसतो आहे. रेल्वेच्या या फाटकावर ‘रोड अंडर ब्रीज’ (आरओबी)चे काम सुरू करण्यात आल्याने २१ नोव्हेंबरपासून हा मार्ग बंद करण्यात आला आहे. सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहनचालकांनी मुख्य मार्ग गाठावा कुठून? हा प्रश्‍न स्थानिक रहिवाशांना पडला आहे.

Manishnagar
भूखंड लाटणारा मुख्यमंत्री शिंदे यांचा 'तो' खासमखास कोण?

वर्धा मार्गावर जाण्यासाठी सोमलवाडा-मनीषनगरचे रेल्वे क्रॉसिंग नरेंद्रनगरच्या रहिवाशांसाठी मुख्य मार्ग मानला जातो. हा मार्ग बंद करण्यात आल्याने आता उजव्या हातावर असलेल्या बुधवार बाजार मार्गावरुन जाण्याचा प्रयत्न करताना. मात्र, या मार्गावर देखील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने वाहन चालकांना युटर्न घ्यावा लागतो. गल्ली-बोळांचेनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरेंद्रनगरमधून वाट शोधत नरेंद्रनगर चौकाकडे जाणारे उड्डाणपुलापर्यंत कसेबसे पोहोचल्यास येथेही डिव्हायडर लावण्याचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळते. तर, रेल्वे फाटकाकडून चिंचभवन (वैशालीनगर मार्गे)कडे जाणाऱ्या रस्त्याचे देखील सिमेंटीकरण सुरू आहे. नरेंद्रनगरच्या निमुळत्या रस्त्यांमधून वाट काढत नरेंद्रनगर चौकामध्ये आल्यास डिव्हायडर लावलेले दिसतात. उड्डाणपुलाच्या लगतच्या सर्व्हिस लाईनचा वापर करून चौक गाठल्यास झाडाखाली लपलेले वाहतूक पोलिस अचानक वाहनचालकांसमोर येत कारवाई करतात. नरेंद्रनगर रहिवाशांसाठी वाहतुकीत झालेल्या बदलाबाबत वाहतूक विभागाने जनजागृती करावी, अशी अपेक्षा रहिवासी करीत आहेत.

Manishnagar
नाशिकरांसाठी 2 गुड न्यूज! आता मुंबई, पुण्याला जायची गरज नाही, कारण

निवडणुकांच्या तोंडावर कामे
भविष्याचा विचार करता होणारा विकास स्थानिकांच्या सोयीचाच असला तरी प्रमुख मार्गांवर एकाचवेळी विकासकाम सुरू झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने लावलेला कामाचा हा सपाटा आहे का? असे प्रश्‍न स्थानिकांना पडत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com