तगादा : औरंगाबादेत याचिकाकर्त्यांनाच पालिकेकडून काळ्या पाण्याची...

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : किमान सणासुदीच्या काळात दोन किंवा तीन दिवसाला शहरात पाणीपुरवठा व्हावा अशी याचिका औरंगाबाद खंडपीठात  दाखल करत औरंगाबादकरांचे हित जोपासणाऱ्या सिडको परिसरातील एन-३ व एन-४ वासियांसमोर दूषित पाण्याचे संकट उभे करत येथील नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले की, काय असा प्रश्न येथील सेवा निवृत्त अधिकारी अर्जुन चव्हाण तसेच समाजसेवक मनोज बोरा यांनी उपस्थित केला आहे.

Aurangabad
तगादा : सिडकोत भरला समस्यांचा बाजार; साथरोगाने नागरिक बेजार

जलकुंभ उषाला, कोरड घशाला

सिडको परिसरातील सिडको एन-३, एन-४ याभागातील नागरिकांसाठी सिडकोने महापालिकेला कोट्यावधीचा भुखंड उपलब्ध करून दिला. त्यावर १५ वर्षांपूर्वी महापालिकेने ४० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारला. मात्र, जलकुंभ उशाशी आणि कोरड घशाशी असाच अनुभव येथील टॅक्सस्पेअर लोकांना आला. कारण ज्यांच्यासाठी जलकुंभ उभारला त्यांना पाणी न देता इतर गुंठेवारी वसाहतील पाणीपुरवठा सुरू केला. 

१८ लाखाचे टेंडर रद्द केले

गेल्या ४० वर्षांपासून येथील नागरिकांना सिडको एन-पाच येथील जलकुंभाची उंची २० मीटर अधीक असल्याने या भागात प्रेशरने पाणी येते असे कारण पुढे करत हनुमाननगर जलकुंभावरून जलवाहिने टाकण्याचे १८ लाखाचे टेंडर महापालिकेने रद्द केले. शेवटी पाणी कोणत्याही जलकुंभावरून द्या, मात्र दोन किंवा तीन दिवसाआड द्या अशी या भागातील नागरिकांची मागणी होती. परंतु महापालिका प्रशासनाने डोळेझाक केली. त्यानंतर येथील नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली . खंडपीठाने देखील येथील नागरिकांची दखल घेत महापालिकेला वेळोवेळी तीन दिवसाआड पाणी देण्याचे आदेश दिले. सोमवारी देखील तेच आदेश कायम केले. मात्र प्रत्येक वेळी महापालिका एक ते दिड महिन्याचा कालावधी मागत वेळ मारून नेत आहे.

Aurangabad
तगादा : महापालिका हद्दीतील खेड्यांचे झाले शहर; समस्यांचा मात्र कहर

याचिकाकर्त्यांच्या परिसरातच काळेपाणी

तीन दिवसाआड पाणीपुरवठा करणे तर दुरच. मात्र याचिकाकर्त्यांच्या सिडको एन-३, एन-४ या भागातील जी सेक्टर, एफ-सेक्टर तसेच स्पंदननगर, तापडीया पार्क, पारिजातनगरासह एन - दोन परिसरातील झांबड टाॅवर आदी भागात  गेल्या तीन-चार महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे शहरात स्वाईनफ्लूचे संकट उभे असतानाच नळाला येणाऱ्या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होईल, अशी भीती व्यक्त नागरिकांनी व्यक्त केली आहे. धक्कादायक म्हणजे यासंदर्भात नागरिकांनी महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांच्याकडे  तक्रार केली तरी पालिका प्रशासन मात्र अद्यापही कुंभकर्णी झोपेत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

८ ते १५ दिवसाआड पाणी

औरंगाबादेत सिडको एन-३ व एन-४ ही वसाहत उच्चभ्रू म्हणून ओळखली जाते. यात नामांकित वकील, न्यायमूर्ती, प्रोफेसर, डाॅक्टर, उद्योजक आणि मोठ्या शिक्षण महर्षींपासून बडे सरकारी अधिकारी या भागात वास्तव्यास आहेत. सुमारे पाच ते सहा हजार लोकांची ही हायप्रोफाईल वसाहत आहे. शहरातील इतर भागाप्रमाणे येथेही ८ ते १५ दिवसानंतर नळाला पाणी येते. एकीकडे जायकवाडी जलाशयात मुबलक पाणी साठा असताना औरंगाबादसह या भागात नेहमीच पाण्याचा तुटवडा असतानाच गेल्या तीन-चार महिन्यांपासून नळाला दूषित पाणी येत असल्याची माहिती येथील रहिवासी अर्जून चव्हाण आणि समाजसेवक मनोज बोरा यांनी दिली.

नळावाटे ड्रेनेजचे पाणी

ड्रेनेज लाइन कुठेतरी फुटलेली असावी व तेथूनच पाणी पुरवठा करणारी ब्रेंच जलवाहिनी जात असल्यामुळे हे दूषित पाणी नळाद्वारे येत असावे असे त्यांचे म्हणणे आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही. या पाण्यास प्रचंड दुर्गंधी येत आहे. त्यामुळे काही नागरिकांना विकतच्या जारच्या पाण्याचा तर काहिंना टँकरच्या पाणी मागवावे लागत आहे. गेल्या तीन ते चार महिन्यापासून हा त्रास होत असून वारंवार तक्रार, पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटलेला नाही, असा आरोपही बोरा यांनी  केला आहे. स्वाईनफ्लूने आधीच सर्वत्र थैमान घातले आहे, त्यात नळाला येणारे असे दूषित पाणी यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून तातडीने प्रश्न निकाली काढण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

काय म्हणतात तक्रारदार 

आम्ही महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांना हा प्रश्न सोडविण्याचे साकडे घातले. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिली. महापालिकेचे कर्मचारी दुरुस्तीसाठी आले, पण कधी ड्रेनेज विभागाचे कर्मचारी नाही तर कधी पाणी पुरवठ विभागाचे नाही, असा खेळ दोन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे अद्याप तरी हा प्रश्न सुटला नाही.

- अर्जून चव्हाण, जेष्ठ नागरिक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com