Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama

गडकरींच्या 'या' मोठ्या प्रकल्पाचे टेंडर थेट फ्रान्सच्या कंपनीला

Published on

नागपूर (Nagpur) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भूमीपजून केलेल्या नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचे टेंडर फ्रांसच्या एका कंपनीला देण्यात येणार आहे. या संदर्भात फ्रांसचे कौंसिल जनरल मार्क शेवरले यांनी नागपूर महापालिका आयुक्तांची शहरात येऊन भेट घेतली. ही कंपनी नागनदीच्या सौंदर्यीकरणाचे काम करणार असल्याचे समजते.

Nitin Gadkari
नाशिकमध्ये रिलायन्सच्या फार्मा कंपनीची ४२०० कोटींची गुंतवणूक

नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स शेवरले यांच्यासोबत नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पासंदर्भात सुमारे दोन तास चर्चा केली. याप्रसंगी लिओनेल गोमेरिक, कौंसिल जनरल ऑफ फ्रान्सचे प्रतिनिधी अभय टिकेकर उपस्थित होते. नागगदीचे शुद्धीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी केंद्र शासनाने नुकतीच आरखड्याला मंजुरी दिली आहे. सुमारे दोन हजार कोटींचा हा एकूण प्रकल्प आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या नदीतून बोट चालवण्याचा संकल्प सोडला आहे. सुमारे चार वर्षांपासून ते या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. नागनदी शहराच्या मध्य भागातून पश्चिम ते पूर्व अशी वाहते. महापालिकेने सर्व मलवाहिन्या या नदीला जोडल्या आहेत. त्यामुळे आता ही नदी मलवाहून नेणारी झाली आहे.

Nitin Gadkari
स्मार्ट वीज वितरणासाठी नाशिकला दोन हजार कोटींचा आराखडा

नागनदीच्या उगमाच्या पाण्यावर अंबाझरी तलाव बांधण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छता आणि मलवाहिन्यांचे पाणी बंद केल्यावर नागनदीमध्ये पाणी कुठून येणार असा प्रश्न आहे. यावरही तोडगा काढण्यात येणार आहे. मलवाहिन्यांमधून येणारे पाणी शुद्ध करण्यासाठी पाच एसटीपी लावण्यात येणार आहेत. येथे शुद्ध झालेले पाणी नागनदीत सोडण्यात येणार आहे. हे पाणी वाहते राहावे याची सोय केली जाणार आहे. फ्रान्सच्या कंपनीने नागनदी व शहरातील इतर सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पात आर्किटेक्चर आणि नगर विकासासंबंधी नियोजनाबाबत तांत्रिक सहकार्य  करावे, अशी इच्छा या भेटीत महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली. कौंसिल जनरल मार्क शेवरले यांनीसुद्धा या प्रकल्पात रुची दाखवली. त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती आणि त्यातील अडचणी जाणून घेतल्या.

Tendernama
www.tendernama.com