रेल्वेच्या थर्ड लाईनमुळे 'या' 14 गाड्या रद्द; प्रवाशांना फटका

Indian Railways
Indian RailwaysTendernama

नागपूर (Nagpur) : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेकडून दुर्ग-राजनांदगाव-नागपूर विभागादरम्यान तिसऱ्या मार्गाचे काम सुरू आहे. याच कामाअंतर्गत राजनांदगाव-कळमना रेल्वे विभागाच्या मध्यभागी साळवा स्थानकाला तिसऱ्या रेल्वे मार्गाशी जोडण्याचे काम केले जाणार आहे. या नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे ६ ते १० नोव्हेंबर दरम्यान १४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Indian Railways
'मिहान'मधील कंपन्या दुसऱ्या राज्यांत जाण्याची शक्यता; कारण...

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये : कोरबा-इतवारी ७ व ९ नोव्हेंबरला रद्द करण्यात आली. इतवारी-कोरबा एक्स्प्रेस ६ व ८ नोव्हेंबरला रद्द, बिलासपूर-इतवारी व इतवारी-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस ८ व ९ नोव्हेंबरला रद्द करण्यात आली. रिवा-इतवारी/इतवारी-रिवा या दोन्ही गाड्या अनुक्रमे ५ व ७ आणि ६ व ८ नोव्हेंबरला रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे दुर्ग-गोंदिया/गोंदिया-दुर्ग मेमू स्पेशल ७ व ९ नोव्हेंबरला रद्द करण्यात आली आहे. गोंदिया-इतवारी/इतवारी-गोंदिया मेमू ७ व ९ नोव्हेंबरला रद्द करण्यात आली.

Indian Railways
चाकणमधील वाहतूक कोंडी फूटणार? 'असा' आहे पर्यायी मार्ग...

तसेच रायपूर-इतवारी/इतवारी-रायपूर स्पेशल पॅसेंजर अनुक्रमे ६ व ९ नोव्हेंबर आणि ७ व १० नोव्हेंबरला रद्द करण्यात आली आहे. तिरोडी-इतवारी/इतवारी-तिरोडी  दोन्ही ७ व ९ नोव्हेंबरला पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. यासोबतच ६ गाड्या मध्येच समाप्त करण्यात आल्या असून, ९ गाड्या परिवर्तित करण्यात आल्या आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

Indian Railways
ठाण्यातील सर्वाधिक वर्दळीचा चौक होणार कोंडीमुक्त; दोन पुलांसाठी...

१२२ किमीचे काम पूर्ण
दुर्ग ते पनियाजोब, बोरतवाल ते दरेकसा आणि काचेवानी ते भंडारा रोड असे एकूण १२२.८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. ही तिसरी लाईन पूर्ण झाल्यानंतर गाड्यांच्या संचलनात मोठी सुधारणा होणार आहे. या मार्गामुळे अधिकाधिक गाड्या चालवणे शक्य होणार आहे. सोबतच क्षेत्राचा विकास, आर्थिक आणि औद्योगिक विकास, नवीन रोजगाराला चालना मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com