पारशिवनी-खापरखेडा रस्त्यावरून 'संभलके'; खड्ड्यांमुळे मरण अटळ?

Potholes
PotholesTendernama

नागपूर (Nagpur) : पारशिवनी-खापरखेडा मार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आले होते. डांबरीकरण होते न होते तोच डांबरी रस्ता अल्पकाळातच जागोजागी खड्डेमय होण्यास सुरवात झाली. या खड्ड्यांच्या रस्त्यावरून लहान-मोठ्या वाहनचालकांना वाहन चालवित असताना कमालीच्या मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच एखाद्या वाहनचालकांचा रस्त्यातील खड्डयात पडून अपघात झाल्यास मरण अटळ अशी परिस्थिती या रस्त्याची झाली आहे. संबंधित विभागांतील वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नियमित अपघातांची श्रृंखला दिवसागणिक वाढत आहे.

Potholes
रिंगरोडचे भूसंपादन ३० दिवसांत संपवा; मोपलवारांनंतर कलेक्टरचे आदेश

पारशिवनी-खापरखेडा मार्गावर दररोज हजारो लहान-मोठी वाहने सुसाट धावत असतात. रस्त्यात ठिकठिकाणी भगदाड, खड्डे, उखळलेली गिट्टी अस्ताव्यस्त पडून असताना मात्र या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास वर्ष-महिने सा.बां. विभागाला लागतात. तात्पुरते रस्त्यावरील उखडलेल्या ठिकाणी ठिगळे लावून चालढकल करीत काम भागविले जाते. परसोडी फाटा ते दिगलवाडीपर्यंतचा मार्ग तर अतिसंवेदनशील असून, या ठिकाणी जर अपघात झाल्यास जीव वाचण्याची शक्यता अधिकच कठीण. असा हा मार्ग आज येथील वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत असताना मात्र संबंधित विभाग डोळे मिटून आहे. 

Potholes
पुणेकरांसाठी गुड न्यूज; लवकरच निघणार रिंगरोडचे टेंडर

पारशिवनी-खापरखेडा रोडवरील अमन सभागृहासमोरील हा डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याकरीता फोडण्यात आला होता. मात्र या खड्डयात मातीच भरण्यात आली नाही. पूर्ववत हा रस्ता तयार करण्यात न आल्याने या ठिकाणी दररोज वाहनचालक पडून अपघातग्रस्त होतात. मंगळवारी सकाळी याच ठिकाणी दोन वाहनांची आमोरासमोर धडक झाल्याने एका युवक गंभीर जखमी होऊन पाय तुटल्याची घटना घडली. जेव्हा की सां. बा. विभागाने हा रस्ता तातडीने दुरुस्त करून घेणे गरजेचे होते. नगरपंचायत प्रशासनाने हा फोडलेला रस्ता ठेकेदारांकडून दुरुस्त करून घेणे आवश्यक होते. मात्र या गंभीर समस्येकडे ना सां. बा. विभागाने ना कत्रांटदाराने, ना नगरपंचायतीने लक्ष दिले. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होऊन नागरिकांना जीव गमावण्याची वेळ आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com