फडणविसांचा इशारा कोणाकडे! रेती चोरणारा नागपुरातील 'तो' नेता कोण?

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरात झालेल्या कोळसा खान आणि व्यवसायावर आधारित मिनकॉन परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वाळू चोरणारे नेते असो वा अधिकारी कोणाला सोडणार नाही, असा इशारा दिला होता. आता वाळू चोरी करणारा जिल्ह्यातील नेता कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Devendra Fadnavis
पुणे रिंगरोडचा 'खेळ'च; सल्लागारावर खर्च केलेले 'एवढे' कोटी पाण्यात

नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू घाट आहेत. यात मोठमोठे व्यावसायिक, वाळू माफिया गुंतले आहेत. त्यांना काही राजकीय नेत्यांचा आर्शीवाद लाभला आहे. वाळू घाट जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे, त्यामुळे पहिले लक्ष सावनेर, कामठी, उमरेड, रामटेक आणि काटोल विधानसभा मतदारसंघाकडे जाते. याच मतदारसंघात सर्वाधिक नद्या आणि वाळू घाट आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात वाळू घाटावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ठिगणी पडली होती. पालकमंत्री नितीन राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सावनेर मतदारसंघातील काही घाटांवर धाडी टाकल्या होत्या. मात्र नंतर लगेच हे प्रकरण शांत झाले होते. वाळू घाटावरून काँग्रेसच्या आमदारांमध्ये धुसफूस झाली होती.

Devendra Fadnavis
'नासुप्र'ला बिल्डर लॉबीचा वेढा; 1.75 लाख अनधिकृत भूखंड आले कुठून?

राज्यात शिंदे सेना-भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपचे ग्रामीणचे माजी अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी वाळू चोरी, बनावट टीपीद्वारे होत असलेल्या उपस्याची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच पोलिस आयुक्तांकडे केली होती. मध्य प्रदेशातील टीपीवर नागपूरमध्ये वाळूचा उपसा केला जात असल्याची त्यांनी सविस्तर माहिती दिली होती. काही नेत्यांच्या नावाचाही उल्लेख त्यांनी आपल्या तक्रारीत केला होता.

Devendra Fadnavis
पुण्यात रेल्वेचा Mega Block! दिवाळीनंतर रोज ७० गाड्या होणार रद्द?

अलीकडेच पोलिसांनी वाळू चोरट्यांवर मोठी कारवाई केली होती. ग्रामीण भागातील काही नेत्यांच्या समर्थकांवर गुन्हे सुद्धा दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान कोणाला तरी इशारा देणारे आहे असे दिसून येते. त्यांचा रोख काँग्रेसच्या एका माजी मंत्र्यांकडे असल्याचे जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com