'या' कारणामुळे रखडला नागपुरातील विधान भवनाचा विस्तार? वादग्रस्त...

Nagpur Vidhan Bhavan
Nagpur Vidhan BhavanTendernama

नागपूर (Nagpur) : नागपुरातील विधान भवनाच्या (Nagpur Vidhan Bhavan) इमारतीचा विस्तार केला जात असून, परिसराच्या सभोवतालच्या काही इमारती अधिग्रहित करण्यात येणार असल्याने अनेकांच्या जागा जाण्याची शक्यता आहे. मात्र विधान भवनाच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या वादग्रस्त बिल्डर्सची समजूत कढण्याचे जिकरीचे काम राज्यातील नेत्यांना करावे लागणार आहे.

Nagpur Vidhan Bhavan
जमिनीचा मोबदला न दिल्याने अभियंत्यासह 82 कर्मचाऱ्यांचे गोठवले वेतन

विधान भवनाची जागा अपुरी पडत असल्याने लगतची जागा अधिग्रहण करण्याची गरज असल्याचे सुतोवाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. समोरील निर्माणाधिन इमारत अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव जुनाच असून, लगत शासकीय इमारतीसह मागील शाळेच्या जागेचासुद्धा विचार होत असल्याची माहिती आहे. हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळाच्या होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याचे समजते.

Nagpur Vidhan Bhavan
'हा' प्रकल्प पुण्यातील वाहतुकीची कोंडी फोडणार; निओ मेट्रोचा...

विधान भवनात विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था नाही. मुंबईत ही व्यवस्था आहे. या व्यवस्थेअभावी अर्थसंकल्पीय अधिवेशन घेता येणार नसल्याचे स्पष्टीकरण तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारच्या काळात देण्यात आले होते. त्यामुळे येथे नव्या सेंट्रल हॉलची गरज आहे. विधान भवनात जागेची कमी आहे. नवीन बांधकाम करण्यासाठी जागा अपुरी पडणार असल्याने आजूबाजूची जागा अधिग्रहित करणे गरजेचे असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Nagpur Vidhan Bhavan
'शिंदे-फडणवीस अजून एक प्रकल्प राज्याबाहेर चाललाय, माहिती आहे का?'

विधान भवन परिसरात नवीन बांधकाम करण्यासाठी समोरील निर्माधान इमारतीची जागा अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव तसा जुना आहे. या इमारतीत कार्यालय तयार करून विधान भवनापर्यंत भूमिगत मार्ग तयार करण्याची चर्चा होती. परंतु संबंधित इमारत मालकाने याला विरोध दर्शविल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नवीन जागा अधिग्रहित करण्यावरही प्रशासनाकडून विचार होत असल्याची चर्चा आहे. बाजूला एक शासकीय इमारत आहे. तर मागच्या बाजुला एक इमारत असून ती शासकीय जागा आहे. विभान भवन परिसराचा विस्तार करण्यासाठी या सर्व जागेबाबत चर्चा होणार असल्याचे समजते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आधीच विधिमंडळाच्या पुढील बैठकीत यावर चर्चा होणार असून तसा प्रस्ताव प्रशासनाला तयार करण्याच्या सूचना केल्याचे सांगितले आहे. डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बैठक होण्याची शक्यता असून यात याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता प्रशासनच्या प्रस्तावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur Vidhan Bhavan
फडणवीसांचे पुण्याबद्दल मोठे विधान; मल्टिमॉडेल रिंगरोड होणार...

विधानभवनासमोर बिल्डर एन. कुमार याने फिरते हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला होता. तीन मजली इमारतही उभी केली होती. त्यानंतर हे हॉटेल विधान भवन व व्हीआयपींसाठी धोकादायक ठरू शकते असे निदर्शनास आले. त्यानंतर या हॉटेलच्या बांधकामाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे सुमारे २० वर्षांपासून ही इमारत पडून आहे. फक्त एक जोडे-चपलांचे शो रूम येथे आहे. ही जागा सोडण्यास एन. कुमार तयार नाही. त्याने दुप्पट मोबदला मागितल्याने चर्चा फिस्कटली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com