'या' नेत्याचे मंत्रिपद गेले अन् कामे थंडावली; काय आहे प्रकरण...

Sunil Kedar
Sunil KedarTendernama

नागपूर (Nagpur) : सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल केदार हे मंत्री असताना धडाक्यात सुरू करण्यात आलेली भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे आता रेंगाळली आहेत. त्यामुळे ठेकेदारांनाही कामे थांबवली आहे. अर्धवट कामे व खोदकामांमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Sunil Kedar
एकनाथा, माऊलींच्या 'या' अनाथ उद्यानाचे 'नाथ' व्हा आता! कारण...

चिचपुरा व पेठपुरा परिसरात खोदकाम करून कामे सोडून देण्यात आली आहेत. शहरातील पाणीपुरवठा विद्युत प्रवाहाच्या कमी दाबामुळे विस्कळीत होत असल्याने महावितरणला ऐक्सप्रेस फिडर देण्याची अत्यंत गरज आहे. केदार मंत्री नसल्याने कामे ठप्प झाली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विरोधकांच्याही हात कोलित मिळाले आहे.

Sunil Kedar
राज्याचा मेकओव्हर करणाऱ्या 'या' ३६ प्रकल्पांवर थेट सीएमओचे लक्ष

माजी नगरसेवक तथा तालुका भाजपचे महामंत्री तुषार उमाठे यांच्या पुढाकारात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्या दीपाली मांडेलवार यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमिनीवरून विद्युत वाहिन्या काढून जमिनी खालून नेण्याचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सावनेर शहरातही आईएमपीएसचे अंडरग्राउंड योजनेंतर्गत मंजूर कामातील काही कामे चिचपुरा व पेठपुरा परिसरात महावितरणने सुरू केली होती. ही कामे वेळेत पूर्ण न करता बरीच कामे अर्धवट आहेत. कामात खोदलेले रस्ते नादुरुस्त आहेत. अद्यापही झालेल्या कामातील येथील वाहिन्या कार्यान्वित नाही. कामात बराच विलंब होऊनही अनेक कामे अर्धवट थंड बसत्यात आहेत. शहरातील गजबजलेल्या जुन्या वस्त्या होळी चौक, बाजार चौक, माताखेडी व चिचपुरा आदी परिसरांमध्ये ठिकठिकाणी कुठे लोकांच्या घरावरून तर कुठे आवारातून विद्युत तारा गेल्या आहेत. अशा वस्त्यांमध्ये तातडीने कामे पूर्ण करणे आवश्यक असताना दुर्लक्ष केले जात आहे.

Sunil Kedar
ठेकेदारांनो, नाशिकमध्ये रस्ते खोदण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतच मुदत

महावितरणने येथील कामाचे नियोजन करावे जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे व वेळीच कामे पूर्ण करावी, याशिवाय सावनेर शहरात ५०टक्के पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वोदय नगर येथील पाणी टाकी व इतर उपकरणाला, तसेच नागरिकांना एकाच फिडरवरून विद्युत पुरवठा असल्याने बरेचदा विजेच्या कमी जास्त दाबामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊन उपकरणात बिघाड होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहकच त्रास होऊन पाणीपुरवठ्यालाही झळ सहन करावी लागत आहे. यासाठी महावितरणने ११ केव्हीचे एक्सप्रेस फिडर द्यावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या कार्यकारी अभियंता दीपाली मांडेलवार यांच्याकडे केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com