महाजेनको-एमएसएमसीच्या अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींची अफरातफर?

Coal
Coal Tendernama

नागपूर (Nagpur) : खापरखेडा महाऔष्णिक केंद्राने जळालेला कोळसा (बर्न कोल) दोन हजार रुपये, तर चंद्रपूरने हजार रुपये टनाने लिलावाद्वारे विकाला. दुसरीकडे कोल वॉशरीचा रिजेक्ट कोल अवघ्या २२० रुपये टनाने विकाला जातो. यावरून महाजेनको (Mahagenco) आणि एमएसएमसीचे (महाराष्ट्र खनिकर्म मंडळ - MSMC) अधिकारी कोट्यवधींची अफरातफर करीत असल्याचे स्पष्ट होते. ही सर्व आकडेवारी 'आरटीआय'अंतर्गत उपलब्ध झाली आहे.

Coal
खड्डे बुजवण्यासाठी बीएमसीचे टेस्टिंग; 'या' तंत्रज्ञानाचा वापर

महाजेनकोने वॉश कोल घेण्यासाठी एमएसएमसीसोबत पाच वर्षांसाठी करार केला आहे. त्यानुसार २२ दशलक्ष मेट्रीक टन कोळसा घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी महाजेनकोने काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांनाच कोल वॉशरी मिळाव्या याकरिता एमएसएमसीला मध्यस्थ म्हणून नियुक्त करण्यात आले. या कंपन्यांना कोल वॉश करताना १५ टक्के रिजेक्ट विकण्यासाठी मुभा देण्यात आली. त्यानुसार ५५ लाख मेट्रिक टन कोळसा रिजेक्ट कोलच्या नावाखारी वॉशरीज आपल्याकडे ठेवतात.

Coal
स्पाॅट पंचनामा : अडीच कोटींच्या शिवसृष्टीत निकृष्ट साहित्याचा वापर

रिजेक्ट कोल ४०० रुपये मेट्रिक टन या दराने महाजेनको वॉशरीजला विकतात. खुल्या बाजारात या रिजेक्ट कोलची किंमत दहा हजार रुपये टन इतकी आहे. घसघशित वाटा मंत्रालयापासून तर महाजेनको, एमएसएमईचे अधिकारी, तसेच कोल वॉश कंपन्यांना मिळत असल्याने कोणीही यावर बोलत नाही. या व्यवहारामुळे महाजेनके व सरकारला सुमारे ५ हजार २८० कोटी रुपयांचा वार्षिक तोटा होत आहे. पाच वर्षांच्या करारानुसार २६ हजार ४०० कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. दुसरीकडे लिलावात विकलेल्या कोळशावर ४०० रुपये टन सेस आकारण्यात आला आहे. मात्र कोल वॉशरीतील रिजेक्ट कोलच्या विक्रीवरचा सेस आकारला जात नसल्याने आणखी २२० कोटी रुपयांचे सरकारचे नुकसान होत आहे.

Coal
औरंगाबाद : MSRTC-महापालिकेच्या वादात नवे स्मार्ट बसस्थानक कागदावरच

मिस्टर 'क्लिन' यांनी आता चौकशी करावी
जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी ही सर्व आकडेवारी माहिती अधिकारी कायद्याचा वापर करून गोळा केली आहे. शंभर-दोनशे कोटींच्या घोटाळ्यात सीबीआय, ईडी सारख्या संस्था तत्काळ हस्तक्षेप करतात. मात्र हजारो कोटींचा घोटाळा आणि त्याचे पुरावे उपलब्ध असतानाही साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात घेतलेले सर्वच निर्णय नवे मुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धडाधड बदलवत आहे. त्यांनाही आम्ही सर्व कागदपत्रे उपलब्ध यापूर्वी करून दिली आहेत. नव्याने आलेले पुरावेसुद्धा देणार आहोत. स्वतःला ‘मिस्टर क्लिन' म्हणणाऱ्या या नेत्यांनी याची चौकशी करावी आणि कोल वॉशरीचा खादाड धंदा बंद करावा, अशी मागणी जय जवानचे अध्यक्ष प्रशांत पवार, सचिव अरुण वनकर, समन्वयक विजयकुमार शिंदे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com