नाशिकमधील 354 कोटींच्या नवीन घंटागाडी सेवेला नोव्हेंबरचा मुहूर्त

garbage
garbageTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील बहुप्रतीक्षित नवीन घंटागाडी सेवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची चिन्हे आहेत. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी नवीन ठेकेदारांचे टेंडर मान्य केल्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाने दिवाळीपूर्वी नवीन घंटागाड्या तपासणीचा अहवाल सादर केला. त्यामुळे दिवाळीपूर्वी नाशिकमध्ये नवीन घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन होईल, असा अंदाज होता. मात्र, घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिवाळीमध्ये कचरा संकलनात त्रुटी निर्माण होऊन नागरिकांना त्रास होण्याची शक्यता व्यक्त केली होती. यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन घंटागाडीची सेवा नाशिककरांचा मिळू शकणार आहे.

garbage
बारामतीत रेल्वेच्या डब्यात मिळणार पाहूणचार! लवकरच...

नाशिक महापालिकेने २०१६ मध्ये दिलेल्या घंटागाडी ठेक्याची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर नवीन ठेकेदार नियुक्तीसाठी टेंडर प्रक्रिया राबवली. मात्र, भाजपचा अंतर्गत वाद व विरोधकांच्या शंकांचे समाधान करण्यात दीड-दोन महिने गेले. या सर्व कलावधीट टेंडर अंतिम होऊन स्थायी समितीने निश्‍चित केलेल्या ठेकेदारांना मान्यता दिली. मात्र, ठराव विलंबाने आल्याचे कारण देत कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया रखडली. घंटागाडी ठेकेदाराला २०१६ मध्ये १७६ कोटी रुपयांना दिलेले टेंडर २०२१ मध्ये ३५४ कोटींवर पोहोचल्याने या टेंडरबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली. या टेंडरमधील अटीशर्ती बदलणे, सीएनजी वाहनांची संख्या कमी करणे, इलेक्ट्रिक वाहनांची अट वगळणे आदी बाबींमुळे हे टेंडर वादात सापडले. मात्र, त्यानंतरही सहा विभागांमध्ये सहा ठेकेदार मे २०२२ मध्ये निश्‍चित करण्यात आले. मात्र, त्याच काळात नाशिक महापालिकेत तीन आयुक्त आले. प्रत्येक आयुक्ताने या टेंडरबाबत शंका घेणाऱ्यांचे समाधान करण्याकरिता अभ्यासासाठी वेळ घेतला. यामुळे तीन आयुक्तांनी तीन वेळा या टेंडरची तपासणी केल्याने त्यात जवळपास वर्ष गेले.

garbage
बुलेट ट्रेनच्या मोबदला वितरणात घोटाळा; मनसे आमदाराची चौकशीची मागणी

यानंतर अखेर ऑक्टोबरमध्ये महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच निश्‍चित करण्यात आलेल्या सहा ठेकेदारांवर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतला. यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तपोवन येथील शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या घंटागाडयांची तपासणी केली व त्याचा अहवाल आयुक्तांना सादर केला. त्यामुळे दिवाळीत नवीन घंटागाड्या सुरू होतील, असा अंदाज होता. तो मुहूर्त टळल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशिककरांना नवीन घंटागाड्यांची सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.

garbage
घरे खासगी बिल्डरांपेक्षा महाग, मग सिडकोची गरजच काय? मूळ हेतू हरपला

नाशिक शहराची सर्वसाधारणपणे २० लाख लोकसंख्या आहे. त्यात ४ लाख ८६ हजार निवासी व व्यापारी आस्थापना आहेत. त्यापूर्वी साधारण अडीचशे घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन होत होता. आता जवळपास दीड लाखाने नवीन मिळकती वाढल्याचे बघून आता ३९६ घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन होणार आहे. या घंटागाड्यांमध्ये १०० सीएनजी, तर १३५ डिझेलच्या घंटागाड्या अशा २३५ नवीन गाड्या असणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com