Stamp Duty: मुद्रांक शुल्क म्हणजे नक्की काय? जाणून घ्या...

Stamp Duty
Stamp DutyTendernama

घर किंवा जमिनीच्या खरेदी-विक्रीचे प्रसंग सर्वसामान्य व्यक्तिंच्या आयुष्यात तुलनेने कमीच असतात. जमीन, घर, फ्लॅट किंवा गाडी अशी खरेदी-विक्री करायची असले तर अशा व्यवहारांमध्ये कुठल्या बाबी महत्त्वाच्या असतात हे माहीत असणे आवश्यक असते. कारण पुरेशी माहिती नसेल तर अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. अज्ञानापोटी होणारी फसवणूक टाळण्यासाठी घर, जमिनीच्या व्यवहारांमध्ये कुठल्या बाबींचा समावेश असतो, त्या संकल्पना नेमक्या काय आहेत, हे समजून घ्यायला हव्यात.

Stamp Duty
ट्रांसफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्‌स (TDR) म्हणजे नक्की काय?

व्यवहारातील महत्त्वाचे टप्पे समजून घ्या

घर खरेदी करायचे म्हटले की आपण सुरवातील केवळ बांधकामाच्या किमतीचा विचार करतो. मात्र कोणतीही वास्तू घेत असताना आपल्याला त्याबरोबर जीएसटी, मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्यूटी आणि नोंदणी शुल्क भरावे लागते. मात्र या सर्व बाबी नेमक्या असतात काय? त्या किती टक्के असतात ? व हे शुल्क कोण आकारते हे अनेकांना माहिती नसते.

Stamp Duty
'ई-टेंडरिंग' करताय, मग हे तीन प्रकार नीट समजून घ्या

स्टॅम्प ड्यूटी

कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार होतो तेव्हा सरकार त्यावर काही कर आकारते. हा कर म्हणजे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी). हे निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेच्या व्यवहारावरावर आकारला जाते. हा कर किती आकारायचा याचे अधिकार राज्य सरकारला आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात हे कर वेगवेगळे आहेत. भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ मध्ये कागदपत्रांची नोंदणी कशी करावी लागेल हे नमूद आहे. राज्यात पाच टक्के मुद्रांक शुल्क आकारले जातो. त्यासह एलबीटी आणि मेट्रो सेस प्रत्येकी एक टक्का आकारला जातो.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com