Government Tender : सरकारी टेंडर मिळविण्याचा 'हा' आहे राजमार्ग!

Govt Teder
Govt TederTendernama
Published on

Maharashtra Government Tender : सरकारी टेंडर प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहे. हे ई-टेंडर (E Tender) कसे दाखल करायचे आणि या प्रक्रियेत कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, हे आपण या लेखातून समजून घेणार आहोत.

Govt Teder
Home Lone घेण्यापूर्वी एकदा हे वाचाच!

डिजिटल स्वाक्षरी : डिजिटल स्वाक्षरी ही टेंडरसाठी तुमची ऑनलाइन ओळख असते. eMudhra किंवा TCS सारख्या अधिकृत संस्थांकडून तुमची डिजिटल स्वाक्षरी प्राप्त करून घ्या.

ऑनलाइन नोंदणी करा : जवळजवळ सर्वच सरकारी ई-टेंडरिंग प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्ही वापरणार असलेल्या प्लॅटफॉर्मची निवड करा आणि तिथे नोंदणी करा.

महत्त्वाचे मुद्दे : टेंडर प्रक्रियेत उडी घेण्यापूर्वी, पात्रता निकष आणि आवश्यक त्या टेंडर दस्तावेजांचा काळजीपूर्वक अभ्यासा करा. तुमची कंपनी पात्र असल्याची खात्री करून घ्या.

Govt Teder
तुमच्या हाउसिंग सोसायटीचे Deemed Conveyance केले आहे का?

ई-टेंडर सबमिट कसे करायचे?

योग्य टेंडरचा शोध : प्लॅटफॉर्मवर लॉग इन करा आणि फिल्टर वापरून तुम्हाला हव्या त्या टेंडरचा शोध घ्या.

माहिती डाउनलोड करा : तुम्हाला योग्य टेंडर आढळले की, तपशीलवार माहिती आणि सबमिशन सूचनांसह संपूर्ण टेंडर दस्तावेज डाउनलोड करा.

बोली तयार करा : टेंडर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून विजयी बोली दस्तावेज तयार करा. यामध्ये वेगळे तांत्रिक आणि आर्थिक प्रस्ताव असू शकतात.

वेळेत सबमिट करा : अंतिम मुहूर्तापूर्वी तुमची संपूर्ण बोली आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करा. सर्वकाही योग्यरित्या फॉरमॅट केलेले आहे याची खात्री करून घ्या

पेमेंट भरा : काही टेंडरसाठी प्लॅटफॉर्मचा पेमेंट गेटवे वापरून शुल्क किंवा डिपॉझिटची ऑनलाइन पेमेंट आवश्यक असते.

Govt Teder
'ई-टेंडरींग'च्या प्रक्रियेचे हे आहेत फायदे?

असे मिळवा टेंडर :

- मुहुर्त चुकवू नका! उशिरा सबमिट केलेले टेंडर सामान्यत: नाकारले जाते.

- सर्व काही तपासासून घ्या. अपलोड केलेली सर्व कागदपत्रे अचूक आणि पूर्ण असल्याची खात्री करा.

- एखाद्या बाबीवर स्पष्टीकरण हवे असल्यास टेंडर प्रसिद्ध करणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या संवाद चॅनेलचा वापर करा.

- नवीन संधींसाठी नियमितपणे टेंडर वेबसाइट तपासा.

- तुमच्या उद्योगातील टेंडरसाठी अलर्ट सुरू करा.

- तुमची तज्ज्ञता दाखवण्यासाठी ई-टेंडरिंग पोर्टलवर तुमचे प्रोफाइल अद्ययावत ठेवा.

वरील सोप्या सूचनांचे पालन केल्यास तुम्ही विश्वासाने ई-टेंडरिंगच्या क्षेत्रात प्रवेश करू शकता आणि महाराष्ट्रातील किंवा भारतातील सरकारी प्रकल्पाचे टेंडर जिंकू शकता.

शेवटी एक गोष्ट ध्यानात ठेवा, टेंडरबाबत माहिती असणे आणि टेंडर भरण्यासाठी आवश्यक ती तयारी असणे हा टेंडर मिळविण्याच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com