'ई-टेंडरींग'च्या प्रक्रियेचे हे आहेत फायदे?

E Tendering
E TenderingTendernama

ई-टेंडरिंगची प्रक्रिया ही काहीशी किचकट आणि गुंतागुंतीची असल्याचे सर्वसाधारणपणे अनेकांचे मत असते. मात्र ही बाब तितकीशी खरी नाही. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कामे अधिक सुलभ करण्यावर सध्या सर्वांचा भर असतो. त्यातूनच टेंडरच्या प्रक्रियेसाठी आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. बदल हा नेहमीच सुरवातीला त्रासदायक वाटत असला तरी तो दीर्घकालीन फायदेशीर असतो. असाच काहीसा अनुभव ई-टेंडरिंगच्या प्रक्रियाबाबत अनेक व्यक्ती आणि संस्थांना येताना दिसतो. सुरवातीला काही प्रमाणात अडचणी आल्या असल्या तरी आता मोठ्या प्रमाणात ई-टेंडरिंगचा वापर केला जातो.

E Tendering
टेंडर मिळणे म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी!

या पार्श्वभूमीवर ई-टेंडरिंगचे फायदे समजून घेतल्यास ऑनलाईन टेंडरिंगबाबतचे गैरसमज दूर होण्यास मदत होऊ शकते. पारंपरिक पद्धतीपेक्षा ई-टेंडरिंगची प्रक्रिया कशा प्रकारे फायदेशीर ठरते हे आपण समजून घेणार आहोत...

E Tendering
प्रकल्प खर्चात वाढ कशी होते?

पारदर्शकता

पारदर्शकता हा ई-टेंडरिंगच्या प्रक्रियेचा सर्वांत महत्त्वाचा फायदा मानायला हवा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टेंडरिंगच्या प्रक्रियेत अमुलाग्र बदल करणे शक्य झाले आहे. ऑनलाईन टेंडरिंगमुळे गैरप्रकार, अधिकारांचा होणारा दुरूपयोग आदींना चाप बसू शकतो. पारदर्शकता आल्यामुळे सहाजिकच भ्रष्टाचारालाही आळा बसतो. त्याचबरोबर या प्रक्रियेतील अनेक त्रुटीही टाळता येतात. खरेदीच्या प्रक्रियेमुळे संस्थेच्या व्यवसायीक धोरणांना कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही हे पाहणे ई-टेंडरिंगमुळे सहज शक्य होते.

E Tendering
टेंडर प्रक्रिया म्हणजे काय?

खर्चात कपात

टेंडरिंगच्या पारंपरिक पद्धतीमध्ये होणारा विविध प्रकारचा खर्च कमी करणे ई - टेंडरिंगच्या सुविधेमुळे शक्य झाले आहे. टेंडरची माहिती देणारी प्रकाशने किंवा वर्तमानपत्रांमध्ये टेंडरची जाहिरात प्रसिद्ध करणे पूर्वी आवश्यक होते. आता ई - टेंडरची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी त्या तुलनेत खूपच कमी खर्च होतो. सुरवातीला टेंडरिंगच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचा वापर केला जात असे. ई - टेंडरिंगमुळे या खर्चातही मोठी कपात झाली आहे. त्याचबरोबर जुन्या पद्धतीमध्ये एकाच प्रकारच्या बाबींची पुनरावृत्ती होत होती, ती नव्या प्रक्रियेत टाळली जाते.

E Tendering
ऑफलाईन टेंडरची मर्यादा दहा लाख

उत्पादकता वाढली

जुन्या पद्धतीच्या टेंडरिंगच्या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज लागत असे. ई - टेंडरिंगमध्ये सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जात असल्याने अतिशय कमी मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे संस्थेतील मनुष्यबळ इतर महत्त्वाच्या कामात वापरता येते. टेंडरिंग सदर्भातील सर्व माहिती अवघ्या काही क्षणात उपलब्ध होते, हा नव्या प्रक्रियेचा मोठा फायदा आहे.

E Tendering
महाराष्ट्र भवनच्या भूखंडाची अदलाबदल कुणासाठी?

पेपरवर्कला फाटा

जुन्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात पेपरवर्क करावे लागत असे. त्यासाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागत असे. त्याचवेळी ही प्रक्रिया वेळखाऊ होती. नव्या पद्धतीमध्ये सर्व माहिती ऑनलाईन साठविली जात असल्याने प्रत्यक्ष कागदपत्रे सांभाळण्याची गरज भासत नाही. सर्व माहितीचा पुनर्वापर करणे सहज शक्य होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com