अधिकाऱ्यांना नांग्या मारणारा भ्रष्टाचाराचा 'खेकडा' कोण?

विजय वडेट्टीवार, रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल
vijay wadettiwar, rohit pawar
vijay wadettiwar, rohit pawarTendernama

Mumbai News मुंबई : टेंडर्स (Tender) आणि खरेदीच्या बेकायदा कामांसाठी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्यावर दबाव आणला होता, त्यास नकार दिल्याने निलंबन केल्याचा दावा पुणे महापालिकेतील (PMC) निलंबित आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार (Dr. Bhagvan Pawar) यांनी केला आहे. डॉ. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना (DCM Devendra Fadnavis & Ajit Pawar) पत्र पाठवून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

vijay wadettiwar, rohit pawar
Nashik News : पंचायत समिती, झेडपी स्तरावरील विकास आराखड्यांची का लागली वाट?

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 'भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड-प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप!' अशा शीर्षकाखाली आपली प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. तर अधिकाऱ्यांना नांग्या मारणारा भ्रष्टाचाराचा खेकडा कोण? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना टोला लगावला आहे.

तानाजी सावंत यांनी आपल्याला पुण्याच्या कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे करण्यास सांगितली होती. त्याचबरोबर इतर खरेदी प्रकरणातही दबाव आणला होता. आपण नकार दिल्यानेच त्यांनी मानसिक छळ करून आपले निलंबन केले, असे डॉ. पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

vijay wadettiwar, rohit pawar
Amravati News : अमरावतीच्या तहसीलदारांचे लेआउट प्रकरणात निलंबन; मात्र अवघ्या 24 तासांत स्थगिती कशी काय?  

आरोग्य विभागात आपली 30 वर्षे सेवा झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपल्या कामाबाबत कोणतीही तक्रार नाही. कोरोना काळात पुण्यात आरोग्य अधिकारी म्हणून आपण उत्कृष्ट सेवा बजावली होती. त्याबद्दल आपला वेळोवेळी सत्कारही झाला होता, असे डॉ. पवार यांनी म्हटले आहे.

आपले कामकाज आणि सेवेची नोंद उत्तम असतानाही केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून आपल्याला त्रास देण्याच्या हेतूने निलंबन करण्यात आले आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझा मानसिक छळ सुरू होता आणि आरोग्य अधिकारी (प्रमुख), महापालिका पुणे हे पद रिक्त करण्यासाठी माझ्या विरुध्दच्या तथ्य नसलेल्या जुन्या तक्रारीच्या अनुषंगाने 29 एप्रिलला समिती स्थापन करून चौकशी न करताच घाई गडबडीत त्यांना अपेक्षित तो अहवाल प्राप्त करून मला निलंबित करणेत आलेले आहे. प्रशासकीय चौकशी झालेली नाही तसेच आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे माझ्या कामकाजाबाबत प्रतिकूल शेरे नाहीत. तरी देखील सरकारमार्फत माझ्या निलंबनाचे आदेश प्राप्त झाले.

माझे निलबंन हे माझ्या विरुध्द तक्रारीमध्ये तथ्य नसतांनाही त्रास देण्याच्या हेतूने व माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मंत्र्यांच्या दबावामुळे केलेले आहे. या निलंबनामुळे माझे मनोधैर्य खचून गेले असून माझे कुटुंब मानसिक तणावात आहे. निलंबन करीत असताना, माझ्या सध्याच्या कार्यकालातील तक्रारी नसताना केवळ जुन्या तक्रारी शोधून काढून आणि माझे म्हणणे सादर करण्याची कोणतीही संधी न देता माझे निलबंन करून माझ्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे हे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी डॉ. पवार यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

vijay wadettiwar, rohit pawar
Nashik : सिंहस्थ पूर्वतयारी; महापालिकेकडून 11 हजार कोटींच्या आराखड्याचे सादरीकरण

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 'भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड-प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप!' अशा शीर्षकाखाली आपली प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. नियमबाह्य काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचा महायुतीमधील मुजोर आणि भ्रष्ट मंत्री कसा छळ करतात त्याचा हा मोठा पुरावा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

'आरोग्य खात्यामधील रुग्णवाहिका घोटाळ्यापासून अनेक विषयांवर जाब विचारूनही सरकारने कारवाई केलेली नाही. आता प्रामाणिक अधिकारीच भ्रष्ट सरकारचा चेहरा जनतेसमोर आणत आहेत. भ्रष्ट मंत्र्यांच्या टेंडरसाठी अशा अधिकाऱ्यांचा बळी देऊ नका. भ्रष्टाचारी सरकार आणि मंत्र्यांनी पापाचा कळस गाठल्यामुळेच अधिकाऱ्यांना न्यायासाठी अशी पत्र लिहिण्याची वेळ आली आहे,' असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

vijay wadettiwar, rohit pawar
Nagpur : तब्बल 70 हजार कोटींत विकला गेला देशी ब्रँड 'हल्दीराम'?

अधिकाऱ्यांना नांग्या मारणारा भ्रष्टाचाराचा खेकडा कोण?

'अधिकाऱ्यांना नांग्या मारणारा भ्रष्टाचाराचा खेकडा कोण?' असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना टोला लगावला आहे. "आरोग्य विभागात रुग्णवाहिका खरेदीमध्ये साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या 'खेकड्या'ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केली आहे. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी शस्त्रक्रिया कधी करणार?'', अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

vijay wadettiwar, rohit pawar
Pune Nashik Highspeed Railway : शिर्डीसाठी 24 Vande Bharat गाड्या चालवून पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग व्यवहार्य करण्याबाबत चाचपणी

डॉ. पवार पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी असताना त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. दरम्यान, तानाजी सावंत यांनी पवार यांची पुणे महापालिकेत प्रमुख आरोग्य अधिकारी म्हणून मार्च 2023 मध्ये वर्णी लावली. मात्र, पवार बेकायदा कामांना साथ देत नसल्याने त्यांची बदली करण्यात आली. या बदलीला पवार यांनी मॅटमध्ये आव्हान दिले. मॅटने बदलीला स्थगिती दिल्याने जुन्या तक्रारींचे प्रकरण उकरून काढत 29 एप्रिलला चौकशी समिती नेमण्यात आली आणि महिन्याच्या आतच 24 मे रोजी पवार यांना निलंबित केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com