Vijay Wadettiwar : ॲम्ब्युलन्स घोटाळ्यानंतर आता 250 कोटींचा साडी - मोबाईल घोटाळा

Tender Scam : वडेट्टीवारांचे शिंदे - फडणवीस - पवार सरकारवर गंभीर आरोप
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarTendernama

मुंबई (Mumbai) : महायुती सरकारची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या सरकारचे ब्रिद आहे. राज्यात आठ हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा (Ambulance Scam) गाजतो आहे. तोपर्यंत सरकारने मोबाईल घोटाळा (Mobile Scam) केला आहे. मर्जीतल्या कंपनीकडून 155 कोटी रुपयांची मोबाईल खरेदी करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्याचबरोबर निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मते मिळवण्यासाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार साड्या वाटणार आहे. हा घोटाळा (Saree Scam) देखील 100 कोटींच्यावर आहे. या दोन्ही घोटाळ्यातील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार असल्याचा जोरदार हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पत्रकार परिषदेत केला.

Vijay Wadettiwar
Amravati : 32 कोटीत शाळा, अंगणवाडी, रस्ते आणि तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट

वडेट्टीवार म्हणाले की, या सरकारमध्ये दोन अलिबाबा आणि 80 चोर आहेत. त्यांच्यात पैसे खाण्याची स्पर्धा सुरू आहे. लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर सरकारी तिजोरी लूटून खाण्याचा सरकारचा इरादा आता लपून राहिला नाही. पैसे खाण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याची शक्कल सरकारने लढवली आहे.

मोबाईल द्यायचा असेल तर सरकारने अंगणवाडी सेविकांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत. अंगणवाडी सेविकांना हवा तो मोबाईल घेण्याची मुभा द्यावी. मग भ्रष्टाचार होणार नाही. अंगणवाडी सेविका प्रामाणिक आहेत. त्यांच्यावर सरकारचा विश्वास नाही का? असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadettiwar
Gondia : निधी खर्चात ग्रामपंचायतींची 'लेटलतीफी'; 175 कोटी आहेत पडून

सरकार दिल्लीतील मर्जीतील कंपनीचा खिसा भरणार आहे. महिला बाल विकास विभाग १५५ कोटी रुपयांचा चुना लावणार आहे. हा घोटाळा सरकारने वेळीच थांबवावा. दिल्लीची ही कंपनी कुणाच्या जवळची आहे याची चौकशी करावी. अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले की, ॲम्ब्युलन्स, मोबाईल घोटाळ्यानंतर आता सरकारने साडी घोटाळा केला आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला महायुती सरकार एक साडी देणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार मते मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

Vijay Wadettiwar
Nashik : महापालिकेचा कामटवाडेतील ‘एसटीपी’साठीही फुकटातल्या जागेचा शोध

राज्यातील महिला असुरक्षित आहेत. राज्यातली तरुणी, महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. गावगुंडांचा, नराधमांचा, रोड रोमियोंचा त्रास सुरूच आहे. महिला सक्षमीकरणात सरकार अपयशी आहे. महिलांना रोजगार मिळत नाही. तरी देखील सरकार दुर्लक्ष करत आहे. सरकार 25 लाख साड्या खरेदी करणार आहे. सरकारचा हा दिखावा आहे. खरेतर सरकारकडून 1 कोटी साड्या खरेदी होणार असल्याची आमची माहिती आहे.

सरकारने हे या साड्या खरेदीचे पैसे महिला सुरक्षेसाठी खर्च करावेत. या सरकाची पत एवढी खाली आली आहे की, यांना निवडणुकीसाठी साड्या वाटण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले.

Vijay Wadettiwar
Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वेसाठी Good News! अर्थसंकल्पात तब्बल 2424 कोटींचा...

दरम्यान, साड्यांचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर औरंगाबादमधील पंतप्रधान आवास योजनेत घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळते. या प्रकरणात या ठेकेदारावर ईडीची सुद्धा कारवाई झाली आहे. हाच ठेकेदार सत्ताधारी पक्षातील एका आमदाराला हाताशी धरून १०० कोटींचा साडी घोटाळा करण्याच्या पूर्ण तयारीत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com