Thane : ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; लवकरच फुटणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा नारळ

International Cricket Stadium Thane
International Cricket Stadium ThaneTendernama

मुंबई (Mumbai) : ठाणे जिल्ह्यात लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (New International Cricket Stadium) उदयास येणार आहे. भिवंडीतील आमणे गावाजवळ तब्बल ५० एकर जागेत हे स्टेडियम होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान विकासित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी - MSRDC) डिसेंबर २०२३ मध्ये टेंडर (Tender) प्रसिद्ध केले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए - MCA) हे टेंडर मिळाले आहे.

International Cricket Stadium Thane
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' ड्रिम प्रोजेक्टला त्यांच्याच कार्यकाळात का लागली घरघर?

एमएसआरडीसीच्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगतच्या जागा टेंडरद्वारे विविध खासगी संस्था, कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडीतील आमणे गावापासून काही अंतरावरील ५० एकर जागा क्रिकेट मैदानासाठी ६० वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे.

भिवंडीतील वडपे गावापासून ५ किमी अंतरावर ही जागा असून सध्या ही जागा एमएसआरडीसीच्या ताब्यात आहे. क्रिकेट मैदानासाठी राखीव असलेली ही जागा विकसित करण्यासाठी एमएसआरडीसीने डिसेंबर २०२३ मध्ये टेंडर प्रसिद्ध केले होते.

टेंडरनुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान विकासित करण्यासाठी इच्छुक संबंधित संस्थेचा अनुभव, त्यांचे किती खेडाळू राष्ट्रीय स्तरावर निवडले गेले आहेत. सदस्य संख्या आदी बाबींची पडताळणी करण्यात येणार होती. त्यानुसार जानेवारीत टेंडर सादर करण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत एमसीएचा एकमेव अर्ज सादर झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील उच्चपदस्थांनी दिली.

International Cricket Stadium Thane
Nashik : नाशिक जिल्ह्यातील आरटीओ मालामाल! तब्बल 454 कोटींचा...

एमसीएच्या टेंडरची छाननी करून एमएसआरडीसीने ५० एकरचा भूखंड एमसीएला देण्यासंबंधीचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. राज्य सरकारची मान्यता मिळताच हा भूखंड एमसीएकडे हस्तांतरित करण्यात येणार असून एमसीए या भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान विकसित करणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. हे मैदान विकसित झाल्यानंतर ठाण्याला पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान मिळणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com