Sambhajinagat News : संभाजीनगरातील 'या' ऐतिहासिक टाॅवरवरील घड्याळाचे कोणी वाजवले 'बारा'?

Clock tower Sambhajinagar
Clock tower SambhajinagarTendernama

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांपूर्वी शहागंज येथील टॉवरवरील ऐतिहासिक घड्याळ दुरुस्त करण्यात आले.‌ त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र भिंतीच्या चार दिशांना लावलेल्या घड्याळात वेगवेगळ्या वेळांचे दर्शन होत आहे. यामुळे या घड्याळातील वेळ पाहून एकच हशा पिकला आहे. महापालिकेच्या वतीने देशभरातील नामांकित तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हे ऐतिहासिक घड्याळ, घंटा आणि सायरन हे तिन्ही दुरुस्त करून वीजपुरवठ्याच्या सहाय्याने सुरू करण्यात आले. यातील घंटा आणि सायरन देखील बंद पडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Clock tower Sambhajinagar
Nashik News : नदीजोड प्रकल्पांचे DPR बनवण्याचे काम आणखी किती वर्षे चालणार?

छत्रपती संभाजीनगरातील शहागंज येथील ऐतिहासिक टाॅवर व घड्याळाचे स्मार्ट सिटीच्या वतीने दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र ते पुन्हा नादुरुस्त झाल्याचे टेंडरनामाच्या पाहणीत समोर आले आहे. येथील नागरिकांच्या तक्रारीनंतर या ऐतिहासिक टाॅवरवरील घड्याळाची शनिवारी सकाळी पावने बाराच्या सुमारास पाहणी केली.

दरम्यान उपस्थित तक्रारदार व्यापाऱ्यांनी किती वाजले आहेत, अशी विचारणा केली. प्रतिनिधीने १२.५० ची वेळ सांगताच त्यांनीही ती कन्फर्म करत नंतर प्रतिनिधीला टाॅवरवरील घड्याळाकडे नजर टाकायला सांगितले. दरम्यान दक्षिणेकडील भिंतीवर १० : ४० तर उत्तरेकडील भिंतीवर २: ४५ तर पूर्वेकडे १:४५ तर दक्षिणेकडे चक्क २:४८ वाजल्याचे दिसले. याशिवाय सायरन आणि घंटा केवळ अमावशा - पौर्णिमेलाच वाजत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

येथील टाॅवरची डागडुजी, रंगरंगोटी आणि घड्याळ, घंटा आणि सायरन दुरुस्तीचे काम खास हैद्राबादच्या तज्ज्ञ कारागिरागिरांमार्फत करण्यात आल्याचा दावा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्यात आला होता. यासाठी तब्बल २९ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या टॉवरचे मात्र पुन्हा तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.

हैद्राबादच्या एका कंपनीने वीजेवर चालणार घड्याळ आणि सायरन सुरू केले होते. रमजान महिन्यात जुन्या शहरात सहर आणि इफ्तारला या टॉवरवरून सायरन वाजवला जात होता. तो रमजान महिन्यातच वाजवला जातो.

Clock tower Sambhajinagar
Nashik : प्रस्तावित नाशिक-पुणे सेमीहायस्पीड रेल्वे मार्गाला आणखी किती फाटे फुटणार?

घड्याळाची दुरुस्ती करूनही ते नादुरुस्त झाले आहे. टायमरकडे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांचे लक्ष नसलेल्याने घड्याळ चारही दिशांना वेगवेगळ्या वेळेचे दर्शन घडवत आहे. शिवाय दुरुस्त झालेल्या टॉवरची देखील केविलवाणा अवस्था झाली असून, रंगरंगोटीतून पोपडे बाहेर पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर शहराच्या इतिहासात शेवटचे निझाम आसीफ जहाँ मेहबूब अलीखान यांनी निझाम राजवटीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहागंज मशिदीसमोर हा क्लॉक टॉवर उभारला होता. ३ मे १९०१ रोजी टॉवरच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. ३० ऑक्टोबर १९०६ रोजी हे काम संपले होते.

Clock tower Sambhajinagar
Pune News : बापरे! अवघ्या 9 दिवसांत पुण्यातील रस्त्यावर आल्या नव्या 4 हजार दुचाकी

मागील १२ ऑक्टोबर २०२१ रोजी टॉवर उभारणीला ११५ वर्षे पूर्ण झाली होती. या टॉवरचे वैशिष्ट्य म्हणजे घड्याळ दर तासाला घंटा वाजवायचे. मात्र २००३ मध्ये यातील सायरन आणि घड्याळ बंद पडले. टॉवरची पडझडही सुरू झाली. स्मार्ट सिटीचे तत्कालीन सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्या पुढाकारातून या टॉवरचे नूतनीकरण करण्यात आले होते. १०० वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने टॉवरचे बांधकाम झाले होते, त्याच पद्धतीने आणि त्याच साहित्याद्वारे हे नूतनीकरण करण्यात  आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आज टाॅवरची स्थिती पाहून तो फोल ठरल्याचा नागरिकांत चर्चा सुरू आहे.

शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळ, घंटा आणि सायरन हे तिन्ही वीजपुरवठा किंवा बॅटरी विनाच चालत होते. मात्र हैद्राबाद येथील तज्ज्ञांनी वीज पुरवठ्याच्या सहाय्याने हे घड्याळ, सायरन दुरुस्त केले होते. यासाठी वेगळा चार लाखांचा खर्च करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com