Mumbai : पनवेल, कर्जतच्या विकासात 'तो' कॉरिडॉर का आहे खास?

Karjat CSMT Via Panvel Local
Karjat CSMT Via Panvel LocalTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईचे उपनगर म्हणून कर्जत, पनवेलच्या विकासातील महत्त्वपूर्ण कॉरिडॉर असलेल्या पनवेल कर्जत रेल्वे मार्गावरील कर्जत हद्दीत असलेल्या तिन्ही बोगद्यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून बोगद्यांची ही कामे सध्या वायूवेगाने सुरू आहेत. २०२५मध्ये या मार्गावरून लोकल वाहतूक सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील आहे.

Karjat CSMT Via Panvel Local
Mumbai Traffic News : मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बीएमसीचा मोठा निर्णय; 'या' 3 पुलांची...

पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉरमध्ये तीन ठिकाणी बोगदे असून त्यातील किरवली बोगदा सर्वात जास्त लांबीचा आहे. त्या तिन्ही बोगद्यांची कामे एमआरव्हीसीद्वारे करण्यात येत आहेत. २ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रकल्पातील सर्वात लांब बोगद्याच्या पी एक आणि पी दोन या दोन्ही पोर्टल्सच्या उद्घाटनासह कामाला सुरुवात करण्यात आली होती. एकूण ३१४४ मीटर लांबीचे तीन बोगदे या प्रकल्पात समाविष्ट आहेत. खोदकाम पूर्ण करण्यासोबत या बोगद्यांमधील ट्रॅक रचना बॅलास्ट लेस ट्रॅकवर असेल. समकालीन आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीने सार्वजनिक आश्रय क्षेत्र, बोगदा नियंत्रण प्रणाली, प्रकाश व्यवस्था आणि वायुवीजन प्रणाली यासारखी पुरेशी स्मार्ट वैशिष्ट्ये तयार केली जात असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले आहे.

Karjat CSMT Via Panvel Local
Mumbai News : सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दम; 'तो' भूखंड 4 महिन्यात द्या, अन्यथा...

सद्यस्थितीत, पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय कॉरिडॉरमधील मुख्य बोगदा-२ (वावरेली बोगदा) चे २ किमी भूमिगत खोदकाम पूर्ण झाले असून, सध्या वॉटर प्रूफिंग आणि काँक्रीट अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर बीएलटी (बॅलास्ट लेस ट्रॅक) शी संबंधित कामे प्रगतीपथावर आहेत. २१९ मीटर लांबीचा मुख्य बोगदा-१ (नधळ बोगदा), २६२५ मीटर लांबीचा मुख्य बोगदा-२ (वावरेली बोगदा) आणि ३ मीटर लांबीचा बोगदा ३ (किरवली बोगदा) या प्रकल्पाचा भाग आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प एमयूटीपी- ३ अंतर्गत पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय कॉरिडॉर प्रकल्प आकार घेत आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com