Panvel : PM मोदींच्या सूरतमधील बस पोर्टच्या धर्तीवर होणार पनवेल ST डेपोचे बांधकाम; मुहूर्तही ठरला

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई विभागातील मध्यवर्ती बस स्थानक म्हणून ओळख असलेल्या पनवेल एसटी आगाराच्या (Panvel ST Depot) विकासकामाला आगामी फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. सुरतच्या बसपोर्टच्या (Surat Bus Port) धर्तीवर याठिकाणी बांधकाम प्रस्तावित आहे. २३५ कोटींचे हे टेंडर (Tender) मे. इडस कंपनीला मिळाले आहे.

Mumbai
Nashik : लोकसभा निवडणुकीपूर्वी 'समृद्धी'ची मिळणार आणखी एक गुड न्यूज!

मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पनवेलमधील बस आगारात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून एसटी गाड्या ये-जा करीत असतात. त्यातून दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक होते. याशिवाय नोकरी-धंद्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिक या बसस्थानकातून प्रवास करतात. मुंबई विभागातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या या स्थानकातून कोकणाकडे जाणाऱ्या बसच्या दररोज हजारो फेऱ्या होत आहेत.

त्यामुळे सूरतच्या बस डेपोच्या धर्तीवर या स्थानकाची नव्याने उभारणी केली जाणार आहे, पण यासाठीच्या काढलेल्या टेंडर तसेच त्यानंतर डिझाईनमधील तांत्रिक त्रुटींमुळे पूर्तता करण्यासाठी वेळ गेला आहे. सध्या अंतिम आराखडा तयार झाला असताना पुन्हा नियमावली बदलल्याने या प्रकल्पाचे नव्याने डिझाईन करण्यात आले आहे.

Mumbai
फडणवीसांची मोठी घोषणा; आता विदर्भातील 'या' शहरातही होणार विमानतळ

या आराखड्याला पनवेल महापालिकेने मंजुरी दिली आहे. याकरिता आठ विभागांचे 'ना हरकत' आणि परवानग्या मिळवल्या आहेत. त्या अनुषंगाने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्पामुळे पनवेलचे महत्त्व अधिकच वाढले आहे. रेल्वेचे टर्मिनस पनवेल येथे होणार आहे. येथील नागरीकरण वाढीचा वेग पाहून एसटी आगाराच्या नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, पण तेव्हा कामाला मंजुरी मिळाली नाही. आता महायुतीच्या काळात मे. इडस कंपनीच्या २३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

२०१८-१९ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार शहरातील १७ हजार ५०० चौरस मीटर भूखंडावर असणाऱ्या पनवेल एसटी स्थानकाच्या जागेवर अद्ययावत बसस्थानक उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. सध्या पनवेल एसटी स्थानकाकडे ८.५० एफएसआय भूखंड उपलब्ध आहे. या भूखंडापैकी ५० टक्के एफएसआयवर बस स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे.

Mumbai
Nashik : ZP CEO अशिमा मित्तल यांचा नागरिकांनी का केला सत्कार? कारण आहे खास!

स्थानकाच्या उर्वरित जागेवर एसटी कार्यालय व व्यावसायिक बांधकाम करण्यात येईल. त्याचबरोबर पार्किंग, अत्याधुनिक स्वरूपाचे फलाट, वर कार्यालय, विश्रामगृह, कॉन्फरन्स हॉल, स्वच्छतागृह याशिवाय इतर सर्व सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर येथे मॉल आणि इंटरनॅशनल स्कूल उभारण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com