मुंबईत खारे पाणी गोड होणार अन् सल्लागाराला १५० कोटी जाणार

गोराईत उभारण्यात येणार खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्प
Gorai
GoraiTendernama

मुंबई (MumbaI) : मुंबईतल्या गोराईत (Gorai) पाणी प्रकल्प (Water Project) उभारला जातोय. पण, या प्रकल्पातील खारे पाणी गोड म्हणजे पिण्यायोग्य व्हावे म्हणून एक सल्लाही घेतला जाणार आहे. मात्र, तुम्हाला कल्पना नसावी इतका महागडा हा सल्ला आहे. तो सल्ला तब्बल दीडशे कोटींचा असेल. गोराई येथे उभारण्यात येणारा खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पासाठी मुंबई महानगर पालिकेने (Mumbai Municipal Corporation) सल्लागार (Consultant) नियुक्तीचा निर्णय घेतला असून, या सल्लागारासाठी 150 कोटी रुपये मोजले जाणार आहेत.

Gorai
मुंबई महापालिकेने 'करून दाखवलं'; बंद शाळांवर ९० कोटींचा खर्च

महापालिकेने खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून रोज 200 दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी 'फिजीबीलीटी रिपोर्ट' तयार करण्याची जबाबदारी महापालिकेने इस्त्राईलमधील कंपनीवर दिली आहे. 2025 पर्यंत पालिकेला हा प्रकल्प सुरू करायचा असून, पहिल्या टप्प्यात 200 दशलक्ष लिटर आणि भविष्यात त्याचा विस्तार करून रोज 400 दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी तयार करण्यात येणार आहे. 200 दशलक्ष लिटरच्या प्रकल्पासाठी 1800 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च आहे. महापालिकेने या प्रकल्पासाठी आता सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) पडताळणी, प्रकल्पाचे डिझाईन तपासणे त्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्प उभारला जात असताना देखरेख ठेवण्याचे काम या सल्लागाराचे असेल. प्रकल्प खर्चाच्या साधारण 6 ते 7 टक्के शुल्क सल्लागाराकडून आकारले जाते.

Gorai
मुंबई महापालिकेने भंगारही नाही सोडले; कोट्यावधींचा घोटाळा

या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वीज खर्च होणार असून, शुध्दीकरणाचा दरही प्रचंड आहे. प्रकल्पासाठीही खर्च मोठा होणार आहे. धरण बांधणीसाठी होणारा खर्चही मोठा होतो तसेच त्यामुळे विस्थापनही होते, असे काही आक्षेप या प्रकल्पाच्या अनुषंगाने चर्चेत आले आहेत. तर धरण बांधण्यासाठी बराच कालावधी लागतो. धरणातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी प्रत्येक हजार लिटरसाठी 17 रुपये खर्च येतो. या प्रकल्पात तो 18 रुपयांपर्यंत असेल, अशी भूमिका महापालिकेची आहे.

Gorai
प्लास्टिक कंटेनरची मुंबई पालिकेकडून चढ्या दराने खरेदी?

आतापर्यंत मुंबईला उत्तर दिशेकडून पाणी पुरवठा होत असल्याने जलवाहिन्या आणि जलकुंभाची रचना त्या पद्धतीची आहे. आता मुंबईच्या पश्‍चिमेकडे हा प्रकल्प असल्याने नव्या जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. मुंबईची पाण्याची गरज 4200 दशलक्ष लिटर आहे. तर, सध्या 3850 दशलक्ष लिटरचा पुरवठा होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com