टाकाऊ अन्नावर चालणार कार; आदित्य ठाकरे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : 'फूड वेस्ट'पासून तयार होणाऱ्या विजेवर वाहने चार्जिंग करणारे प्रकल्प राज्यात उभारण्यात येतील, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली. विशेषतः महामार्गांवर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यातून विद्युत वाहनांच्या वापराला चालना तर मिळेलच, सोबत सेंद्रिय, जैविक स्वरूपाच्या कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होईल, असेही ते म्हणाले.

Mumbai
पालकमंत्री म्हणतात, आठवडाभरात औरंगाबादचा पाणीपुरवठा सुरळीत करू

'फूड वेस्ट'पासून तयार होणाऱ्या विजेवर गाडी चार्जिंग करणारी मुंबई महापालिका देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे. वाया गेलेल्या अन्नापासून तयार होणाऱ्या विजेवर गाडी चार्जिंग करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महापालिकेने 'डी' वॉर्ड ग्रँट रोड विभागात सुरू केला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.

Mumbai
'या' 2 कंपन्यांना झुकते माप? टेंडर 'फ्रेम' केल्याचा बीएमसीवर आरोप

मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी महापालिका पर्यावरणपूरक अनेक उपक्रम राबवत आहे. यामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी नुकतेच इलेक्ट्रिक वाहन धोरणही राबवण्यास सुरुवात करण्यात आले आहे, तर मुंबईत तयार होणाऱ्या कचऱ्याची 100 टक्के विल्हेवाट लावून मुंबईत 'शून्य कचरा' मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये हाजी अली परिसरात केशवराव खाडये मार्गावर माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ महापालिकेने कचर्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सप्टेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे दीड लाख किलोपेक्षा अधिक वाया गेलेल्या अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यात आली आहे.

Mumbai
मुंबई ते हैदराबाद अवघे साडेतीन तासात; 'यामुळे' होणार शक्य

या प्रकल्पातून तयार होणारी वीज इलेक्ट्रिक वाहनांसाठी उपयोगात येणार आहे. या वीजनिर्मिती प्रकल्पाला जोडून इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. याचे लोकार्पणदेखील आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी चार्जिंगसाठी दोन पॉइंट आहेत. या प्रकल्पाच्या लोकार्पणाप्रसंगी पर्यावरण उपआयुक्त सुनील गोडसे, 'डी' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, एरोकेअर क्लीन एनर्जीचे संस्थापक अंकित झवेरी आदी उपस्थित होते. पालिकेचा 'डी' विभाग व एरोकेअर क्लीन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नाने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com