Maharashtra Budget Session 2024 : तिजोरीत खळखळाट अन् थापांचा सुळसुळाट! कोणी केली महायुतीच्या अर्थसंकल्पाची पोलखोल?

Budget Session 2024
Budget Session 2024Tendernama

Maharashtra Budget Session 2024 मुंबई : महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प म्हणजे 'तिजोरीत खडखडाट अन् थापांचा सुळसुळाट', 'बजेटमधून विधानसभेच्या तयारीच्या येतोय वास' या घोषणांनी आज विधानभवनाचा (Vidhanbhavan) परिसर दणाणला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर आज जोरदार निदर्शने करत महायुतीच्या अर्थसंकल्पाची पोलखोल केली.

Budget Session 2024
Mumbai Goa Highway News : यंदाच्या गणेशोत्सवातही मुंबई-गोवा महामार्गाची रडकथा कायम; आता डिसेंबरचा मुहूर्त

लोकसभा निवडणुकीचा घेतला धसका, विधानसभेला मस्का, अशी महायुतीची अवस्था आहे. बजेटमध्ये मोठ्या घोषणांचा पाऊस पडला पण हा तर विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा आटापिटा आहे, यावरून महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले. भाऊ म्हणून दाखवलं महिलांना योजनांचे भूल, महिलाच करतील निवडणुकीत गूल, निधीची वानवा आणि खैरातीचा गारवा, अशा जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्या.

Budget Session 2024
Rohit Pawar News : 14 हजार कोटींचा घोटाळा अन् 6 हजार कोटींचे कमिशन! रोहित पवारांच्या निशाण्यावर कोण?

खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, लुटारू सरकार हाय हाय, 40 टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, या घोषणातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाची पोलखोल केली. या घोषणांचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com