ट्वीन टॉवरप्रमाणे पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडणार अवघ्या...

Chandani Chwok
Chandani ChwokTendernama
Published on

पुणे (Pune) : चांदणी चौकातील कोंडी (Chandani Chowk Traffic) दूर करण्यासाठी एनडीए-पाषाण रस्त्यावरील पूल पाडण्यासाठी कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीचा वापर होणार असून तो १० सेकंदात जमीनदोस्त होणार आहे. या पुलाची मंगळवारी (ता. ३०) पाहणी करण्यात येणार आहे. नोएडा येथील ट्वीन टॉवर ज्या संस्थेने पाडले, तीच संस्था पुण्यातील हा पूल १२ सप्टेंबर रोजी रात्री पाडण्याची शक्यता आहे.

Chandani Chwok
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयामुळे वाढले पुणेकरांचे टेन्शन?

चांदणी चौकातील पाडण्यात येणारा पूल ३० मीटर लांबीचा आहे. पूल पाडण्यासाठी विस्फोटकांचा वापर केला जाणार आहे. यासाठी किती क्षमतेचे विस्फोटक लागतील, तसेच पुलाची व परिसराची माहिती घेण्यासाठी नोएडाहून पथक पुण्यात दाखल होणार आहे. ते मंगळवारी पाहणी करतील, असा अंदाज आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूल पाडण्यासाठी १२ ते १५ सप्टेंबर हा कालावधी निवडला आहे. मात्र, ते काम १० सेकंदातच पूर्ण होणार आहे.

Chandani Chwok
चांदणी चौकात नागरिकांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा; पुढे काय झाले

पूल पाडण्यापूर्वी वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. दोन ते तीन तासांसाठी पुलाचा खालचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com