मुंबईतील 'त्या' 2,400 कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी

मढ आणि वर्सोवा या दोन समुद्रकिनाऱ्यांना थेट पुलाने जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे वेळेची बचत होणार
Madh varsova Bridge
Madh varsova BridgeTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील वाहतूक क्रांतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्य सरकारच्या शिफारशीनुसार मढ – वर्सोवा पूल प्रकल्पाला तत्त्वतः पर्यावरणीय मंजुरी दिली आहे.

सुमारे २,४०० कोटी खर्चाचा हा पायाभूत सुविधा प्रकल्प, १९६७ च्या विकास आराखड्यात प्रथम सूचवण्यात आलेल्या एका महत्त्वाकांक्षी आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्पाला आता निर्णायक गती मिळणार आहे. मढ आणि वर्सोवा या दोन समुद्रकिनाऱ्यांना थेट पुलाने जोडणारा हा प्रकल्प, मुंबईतील नागरिकांचा मोठा वेळ वाचवणार आहे.

Madh varsova Bridge
मुंबईच्या जलवाहतुकीत क्रांती! 15 'फ्लाईंग बोटीं'ची ऑर्डर

मुंबईच्या पश्चिम उपनगरात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या पुलाची निर्मिती केली जात आहे. हा पूल मढ आणि वर्सोवा या दोन समुद्रकिनाऱ्यांमधील अंतर थेट मार्गाने जोडणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मते, या प्रकल्पामुळे मढ – आयलंड ते वर्सोवा प्रवासाचा कालावधी ९० मिनिटांवरून केवळ ५ मिनिटांवर येणार आहे, तसेच प्रवासाचे अंतर २२ किलोमीटरवरून फक्त १.५ किलोमीटरपर्यंत कमी होईल. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

२,४०० कोटींचा मढ – वर्सोवा पूल प्रकल्प हा केवळ वाहतूक सुलभ करणारा मार्ग नसून, तो मुंबईच्या पश्चिम उपनगरांसाठी एक परिवर्तनकारी पायाभूत सुविधा ठरणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास मुंबईतील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार आहे.

मुंबई महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे आणि या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने आधीच मंजुरी दिली आहे.

Madh varsova Bridge
खूशखबर! सिंहस्थापूर्वी नाशिक शहराबाहेरून होणार दोन रिंगरोड

पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचे महत्त्व...

१. जलद आणि सुरक्षित जोडणी
हा पूल मुंबईकरांना अधिक जलद, सुरक्षित आणि शाश्वत जोडणी प्रदान करेल.
पावसाळ्यात बंद राहणाऱ्या फेरी सेवेला कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध होईल, ज्यामुळे स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि पर्यटकांना वर्षभर अखंड प्रवासाची सुविधा मिळेल.

२.पश्चिम मुंबईतील अखंड प्रवास
हा पूल आगामी वर्सोवा-भाईंदर किनारी महामार्गाशी जोडला जाणार आहे, ज्यामुळे पश्चिम मुंबईत अखंड प्रवास शक्य होईल.
मढ बेट आणि वर्सोवा यांना थेट रस्त्याने जोडणी मिळाल्याने लांबचा वळसा टाळता येईल.

३. अर्थव्यवस्थेला चालना
प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्च दोन्ही कमी झाल्याने वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीत सुलभता येईल.
मढ किल्ला आणि समुद्रकिनाऱ्यांपर्यंत सहज प्रवेश शक्य होईल, ज्यामुळे स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन मिळेल.

४. आधुनिक अभियांत्रिकीचे प्रतीक
हा पूल आधुनिक अभियांत्रिकीचे प्रतीक ठरणार असून, प्रस्तावित केबल-स्टे डिझाइनमुळे कमी खांबांची आवश्यकता भासेल.
यामुळे आजूबाजूच्या कांदळवनाचे संरक्षण होईल, जो पर्यावरणीय दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा सकारात्मक घटक आहे.

५. पर्यावरणपूरक दृष्टिकोन
प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्च कमी झाल्यामुळे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात लक्षणीय घट होईल.
या प्रकल्पात संतुलित वनरोपण आणि पर्यावरणीय देखरेखीसाठी मजबूत यंत्रणा यासारखे पर्यावरणपूरक उपाय राबवले जाणार आहेत, ज्यामुळे विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखला जाईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com