कंपन्यांनी मुरुम उपसला अन् आता दुरुस्तीसाठी पाझर फुटेना

Aurangabad

Aurangabad

Tendernama

औऱंगाबाद (Aurangabad) : धुळे-सोलापूर (Dhule to Solapur) राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी औरंगाबाद तालुक्यातील अनेक गावातील तलावांमधून कोट्यावधी रुपयांचा मुरुम उपसा केला. त्यात तलावांची मोठी नासधूस केली गेली. आता ग्रामस्थांच्या राष्ट्रीय महामार्ग विभागात दुरुस्तीसाठी खेटे सुरु असून, यासाठी वारंवार तक्रार करुनही अधिकारी स्थानिक गावकऱ्यांना जुमानत नाहीत. तर, अधिकारी कंपनीकडे तर कंपनी अधिकाऱ्यांकडे बोट दाखवत आहे.

Aurangabad

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टोलची..

धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या औरंगाबाद हद्दीतील आडगाव निपानी ते करोडी या तीस किमीच्या वळण रस्त्याच्या बांधणीसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या इशाऱ्यावर कंत्राटदार एलअँडटी लाॅर्सन ॲन्ड ट्युब्रो या खाजगी कंपनी केलेल्या बेकायदेशीर मुरूम उपशामुळे आडगाव, निपानी, गांधेली, परदरी, गांधेली, बाळापुर, सातारा, देवळाई, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, वाल्मी, विटखेडा, वळदगाव, वाळूज-पंढरपूर करोडी आणि माळीवाडा शिवारातील पाझर तलावातून माती-मुरूमाचा बेकायदेशीररित्या उपसा केला. त्यामुळे असंख्य गावातील रस्ते, पाझर तलाव आणि शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालकांकडे रस्ते आणि गावतलांच्या दुरुस्तीसाठी गेल्या वर्षभरापासून वारंवार तक्रार करूनही येथील अधिकारी स्थानिक गावकऱ्यांना जुमानत नसल्याचा आरोप होत आहे. अधिकारी एलअँडटी कंपनीकडे तर कंपनी अधिकाऱ्यांकडे बोट दाखवत असल्याने आमचा या विभागातून त्या विभागात चकरा मारत फुटबॉल झाल्याचे गावकरी सांगत आहेत. यासंदर्भात टेंडरनामाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता एम. बी. पाटील यांना थेट सवाल करताच कंपनीने मुरूमाचा बेकायदेशीररित्या उपसा केलेला नाही. गौणखनिज नियमानुसार महसूल विभागाला राॅयल्टी भरुन रितसर परवानगी घेऊनच महामार्गासाठी मुरूमाचा उपसा केल्याचा त्यांनी खुलासा केला आहे.

Aurangabad

सांगली पालिकेत फायलींचा धुमाकूळ;नगरसेवक-ठेकेदार-अधिकाऱ्यांचे रॅकेट

कोट्यावधींच्या तलाव आणि रस्त्यांची वाट लागली

तीन वर्षापूर्वी सुरु केलेल्या या रस्त्याच्या बांधणीसाठी आमच्या आजूबाजूच्या गावांमधून कोट्यवधी रुपयांचा मुरूम उपसा केला गेला आहे. गाव शिवारातल्या पाझर तलावांमधून तसेच गावालगत असलेल्या पहाडांमधून आणि शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून हा बेकायदेशीर उपसा केला आहे. रस्ते बांधणी कंपनीने भरलेली रॉयल्टी आणि प्रत्यक्षात उपसलेला मुरूम यांच व्यस्त प्रमाण आहे. रॉयल्टी भरल्याचा दावा करून रस्ते बांधणी कंपनीचा व्यवस्थापक आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिस बळाचा धाक दाखवून स्थानिक गावकऱ्यावर दबाव टाकून बेसुमार मुरूम उपसा केला आहे. त्यामुळं एका मुख्य वळण रस्त्यासाठी आजूबाजूच्या गावांसाठी सरकारने बांधलेल्या कोट्यावधी रुपयांच्या तलावांची आणि रस्त्यांची वाट लागली आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

Aurangabad

कर्जाच्या चक्रात फसलेल्या एसटी महामंडळाची अशीही फसवाफसवी

म्हणून तर गडकरींची तारीख पे तारीख....

याभागातील शेकडो त्रस्त ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर टेंडरनामा प्रतिनिधीने आडगाव ते करोडी प्रवास करत गावपाणीपुरवठ्याच्या पाझर तलाव आणि शेतीसह पहाडांची पाहणी केली. त्यात अपरिमित नुकसान झाले असल्याचे दिसले. त्यामुळे आता ग्रामस्थांकडून आंदोलनाचं हत्यार उपसण्यात येत असल्याची कुणकुण लागताच गडकरी वेळ नसल्याचे सांगत उद्घाटनासाठी तारीख पे तारीख देत असल्याचे या भागातील शेतकरी सांगत आहेत.

Aurangabad

कर्जबाजारी औरंगाबाद महापालिकेची योजना गाळात 'भूमिगत'

परवानगीपेक्षा अधिकचा केला उपसा

मुरुम उपशासाठी शासनाकडुन एलएनटी कंपनीला ६० ते ६५ हजार ब्रासची व जमिनीपासून ३ मिटरची परवानगी देण्यात आली होती. मात्र गेली ३ वर्ष या तलावातुन तसेच पहाडांमधून मुरुमाचा बेसुमार उपसा केला असुन सुमारे लाखो ब्रास व १५ ते २० मिटर खोदाई केल्यामुळे . तलावांना धोका निर्माण झाला आहे.

झालेही तसेच गावकऱ्यांची शंका खरी ठरली

मुरूमाचा उपसा होत असतानाच भविष्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर त्यामध्ये पाणी राहणारच नाही, परिणामी तलावाखाली असणाऱ्या सुमारे शेकडो एकर शेतीत दलदल झाल्याशिवाय राहणार नाही. गावकऱ्यांची ही शंका खरी ठरली. मुरूमाचा उपसा करताना तलावात दगडांचे ढिगारे तसेच ठेवले. सपाटीकरण न केल्याने तसेच पाळुवरून गौणखनिजाची वाहतूक केल्याने पाळुतील दगडांची प्लिचींग व मातीचे बंधारे खिळखिळे झाली. तलावातून जिल्हा परिषदांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतुन विविध गावातील ग्रामपंचायतीच्या विहिर आहेत . या विहिरींना देखील धोका निर्माण झाला असुन खिळखिळे झालेल्या माती बंधाऱ्याखालून तलावातील पाण्याचे पाट वाहत असल्याने उन्हाळ्यात प्रत्येकी तीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या या शेकडो गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येईल अशी धास्ती गावागावात पसरली आहे.

Aurangabad

कोट्यावधींच्या रस्ते कामांसाठी ‘रिंग'; नियमबाह्य ‘क्लब टेंडर'

एका आठवड्यात चौदा प्राण्यांचा बळी

या भागातील पहाडांना लागूनच सुधाकरनगर, सिंदोन-भिंदोन, सातारा-देवळाई, बाळापुर, गांधेली, परदरी, कांचणवाडी, नक्षत्रवाडी, विटखेडा, माळीवाडा आडगाव अशी सातपुडा डोंगरांची रांग आणि या पठारात असलेले नैसर्गिक तलाव, घनदाट नैसर्गिक वन्य संपदेत अनेक वन्य प्रजातींचा येथे मुक्काम आहे. पण त्यांच्या निवासावर हल्ला करून आडगाव निपाणी ते करोडी या तीस किमीच्या बायपासने गत आठ दिवसात १४ वन्यप्राणी आणि चार म्हशींचा बळी घेतल्याने या भागातील शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे. त्यात मुरूमाच्या वाहतूकीने तलावांच्या मातीचे बंधाऱ्यांना गळती लागल्याने गाई-गुरे व जनावरांना तलावात पिण्यासाठी पाणी तर राहणार नाही. त्यात नव्या बायपासच्या दुभाजक ओलांडताना त्या तलावातील पाणी पिण्यासाठी जाणाऱ्या जनावरांचा बळी जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com