भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी भरविला ठेकेदारांचा दरबार

जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील जुन्या कार्यालयात बैठक
Laxman Jagtap
Laxman JagtapTendernama

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि पिंपरी-चिंचवडमधील 'वजन' दार नेते आमदार लक्ष्मण जगताप यांनी कमाल केलीय... ठेकेदार, सल्लागारांना आपल्या बोलावून आपल्या ऑफिसमध्ये चक्क दरबारच भरविला.

Laxman Jagtap
मुंबई महापालिकेने 'करून दाखवलं'; बंद शाळांवर ९० कोटींचा खर्च

भरीस भर म्हणजे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील डेप्युटी आणि ज्युनिअर इंजिअर्सनीही हजेरी लावल्याने जगतापांचा धाक दिसून आला. ही बैठक महत्त्वाची असल्याने ती टाळू नका, अशी तंबीच ठेकेदार, सल्लागार आणि अधिकाऱ्यांना देण्यात आल्याने वेळेआधी म्हणजे, पावणेअकरापासून गर्दी जमविली गेल्याचे सांगण्यात आले. जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील जुन्या कार्यालयात ही बैठक सुरू आहे.

Laxman Jagtap
आश्चर्यच! मुंबईतील २५ हजार कोटींच्या रस्त्यांचा मालक सापडेना?

महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातही विकासकामांच्या आढाव्याचे निमित्त करीत, जगताप यांनी सोमवारी सकाळीच बैठक घेतली; खरे तर ती महापालिकेत घेणे अपेक्षित असतानाही जगतापांच्या कार्यालयात ठरविण्यात आली. तिचा निरोपही महापालिकेतील अधिकाऱ्यांमार्फत ठेकेदार, सल्लागारांकडे पाठविण्यात आला. त्यामुळे ठेकेदार बैठकीकडे पाठ फिरविणार नाहीत आणि सारीच मंडळी उपस्थित राहतील, याची खबरदारी घेण्यात आली. बैठकीला शंभर टक्के हजेरी दिसून यावी, म्हणून प्रमुख अधिकारी आणि ठेकेदारांनी सकाळपासूनच फोनाफोनी करीत, वेळेत येण्याचे कळविले. त्यामुळे साडेदहा-पावणेअकारपासूनच जगतापांच्या कार्यालयात ही मंडळी जमल्याचे सांगण्यात आले. एवढ्या लोकांना आपल्याच दरबारात बोलाविल्याचे जाणीव असलेल्या जगतापांनीही वेळ पाळली आणि वेळेत ऑफिसमध्ये दाखल झाले. आपल्या कामाचा हिशेब होणार असल्याच्या धास्तीने ठेकेदार, सल्लागारही तयारीनिशी बैठकीला आले होते. कामाचे स्वरुप, त्यातील प्रगती, कामे रखडण्याची कारणे, त्यावरचा उपाय याच्या फायलीही हातात ठेवून, 'भाऊ' अचानक भडकणार नाहीत, याचीही काळजी ठेकेदारांकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Laxman Jagtap
टेंडर रद्द करून सरकारने टाळला दरवर्षीचा १२५ कोटींचा भुर्दंड, कसा?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे सुरू आहेत. त्यातच महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आतापासून चढाओढ सुरू आहे. विकासकामांच्या पातळीवरही दोन्ही पक्षांच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात भाजपचे जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर जोरदार घणाघात केला होता. या दोन्ही शहर वाटून घेतले असून, दुकाने थाटल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले होते. अशातच आमदार जगताप यांनी ठेकेदार, सल्लागारांची बैठक बोलविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही बैठक नेमकी कशासाठी, ती तुमच्या ऑफिसमध्ये का घेतली जाते आहे, या मूळ प्रश्नांची विचारणा करण्यासाठी जगताप यांच्याशी सोमवारी सकाळीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्यांचा मोबाईल बंद असल्याने तो होऊ शकला. मात्र, ही आढावा बैठक आहे. ती दर आठवड्याला होते, असे त्यांच्या ऑफिसमधून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com