Budget 2023: आता एवढं उत्पन्न करमुक्त; पाहा काय स्वस्त, काय महाग?

Nirmala Sitharaman: महागाईचे चटके सहन करत असलेल्या देशातील सामान्य करदात्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय
Budget 2023
Budget 2023Tendernama

नवी दिल्ली (New Delhi) : २०२२-२३चा मोदी सरकारचा अर्थसंकल्प (Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केला. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि महागाईचे चटके सहन करत असलेल्या देशातील सामान्य करदात्यांला दिलासा देणारा मोठा निर्णय सीतारामन यांनी जाहीर केला.

Budget 2023
Nashik : झेडपी म्हणते, रस्ता चोरीला गेलाच नाही; आता तक्रार...

देशातील पगारदार वर्गाला मोठा दिलासा देणारी घोषणा सीतारामन यांनी केली. आता ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत दिली जाणार आहे. सध्या पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करसवलतीस पात्र होते. त्यात आता दोन लाखांची वाढ करून सामान्य करदात्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने या माध्यमातून केला आहे. तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलीही कर आकारणी केली जाणार नाही.

Budget 2023
Mumbai: पुणे, सातारा, सोलापूरसाठी राज्य सरकारची गुड न्यूज

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. पायाभूत सेवा क्षेत्रावर सरकार भर देणार असल्याचे सुतोवाच सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातून केले आहेत.

Budget 2023
Nashik ZP : आमदाराच्या हट्टामुळे कार्यकारी अभियंत्याची बदली

स्वस्त

सायकल, खेळणी, कॅमेरा लेन्स, मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रीक वस्तू, बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू

महाग

सोने, चांदी, सिगारेट

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com