Aditya Thackeray : नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी 'तारीख पे तारीख'; आदित्य ठाकरेंचा पुन्हा सरकारवर निशाणा

Narendra Modi
Narendra ModiTendernama

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro) प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी, तिचे उद्घाटन अद्याप झाले नाही. या मेट्रोचे उद्घाटन आज, 30 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात येणार होते. पण ते आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Narendra Modi
Nashik : नाशिकरांसाठी गुड न्यूज! रविवारपासून Indigo ची देशातील 'या' 11 शहरांसाठी विमानसेवा

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावर्षीच्या जानेवारी महिन्यात मुबई मेट्रो 2 अ व मेट्रो 7चे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर 30 ऑक्टोबरला नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते करण्याचे ठरले होते. परंतु अचानक हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या चार वेळा तारखा जाहीर करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कार्यक्रमावर होणारा सुमारे 12 कोटी खर्च आणखी वाढण्याची आणि त्याचा भार सिडको, महामेट्रोवर येण्याची शक्यता आहे.

Narendra Modi
Pune Nashik Expressway : असा असेल पुणे - नाशिक द्रुतगती प्रवास! पहा काय काय बदलणार?

नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख पे तारीख दिली जात असल्यामुळे राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाची तारीख महाराष्ट्रातील बेकायदेशीर शिंदे-भाजपा राजवटीने अद्याप निश्चित केलेली नाही.

नवी मुंबई मेट्रो तयार होऊन नोव्हेंबरमध्ये 5 महिने होतील. मग सरकार वाट कशाची पाहत आहे? उद्घाटनासाठी निवडणुकीच्या हंगामाची का? असा बोचरा सवाल करत, हे किती लज्जास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Narendra Modi
Nashik : जलयुक्त शिवारच्या 'या' कामांवर नाशिक जिल्हा परिषदेने का मारली फुली?

नवी मुंबई मेट्रो उद्घाटनासाठी सज्ज आहे. तरीही, सामान्य नागरिकांसाठी सरकारला वेळ नसून इतर पक्षांतील नेत्यांची 'शिकार' करण्यात ते मग्न आहेत. म्हणूनच खोके सरकारने या मेट्रोचे अद्याप उद्घाटन केले नाही. सार्वजनिक सेवांच्या उद्घाटनासाठी सरकारला वेळ नसेल तर ते लोकांसाठी खुले केले पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी म्हटले होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com