दुष्काळात तेरावा महिना; चांदणी चौकातील पूल पाडण्यात आता ही अडचण...

Chandani Chowk
Chandani ChowkTendernama

पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandni Chowk) पूल पाडण्याच्या कामातील विघ्ने संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार असून, त्यासाठीच्या तयारीनेही वेग घेतला आहे. मात्र, अद्यापही पूल कधी पाडला जाणार हे निश्चित करता आलेले नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (NHAI) यंत्रणा त्यासाठी कामाला लागली असली तरी एकापाठोपाठ एक अडचणी पुलाच्या पाडकामात येत आहेत. त्यामुळे पूल पाडण्याचा मुहूर्त आणखी पुढे ढकलावा लागला आहे.

Chandani Chowk
शिंदे-फडणवीस सरकारमुळे १५३ नवउद्योजक प्रतीक्षेत; हजारो रोजगार..

सुरवातीला जुन्या पुलावरील सेवा वाहिन्या हटविण्यात येत असल्याचे सांगत पूल पाडण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता पुण्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणखी अडथळे निर्माण केले आहेत. त्यामुळे पूल पाडण्याची तारीख आणखी पुढे जाणार आहे. तो पर्यंत या चौकातून प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

Chandani Chowk
नाशिक जिल्ह्यातील 'ही' योजना मार्गी; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

जुना पूल पाडण्यासाठी या पुलावरील सेवा वाहिन्या काढण्यात येत आहेत. महापालिकेने आपल्या मालकीच्या बहुतेक सर्व सेवा वाहिन्या हलविल्या आहेत. मात्र इतर सेवा वाहिन्या अद्याप हलविण्यात आलेल्या नाहीत. या सेवा वाहिन्या पालिकेनेच हलवाव्यात अशी विनंती करण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे सर्व सेवा वाहिन्या हलविण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. दुसरीकडे, जुन्या पुलावरील सर्व सेवा वाहिन्या काढण्यात आल्यानंतरच पुलाच्या पाडकामाला सुरवात करण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com