महत्त्वाची बातमी; 'या' मार्गावर आज - उद्या मेट्रो बंद? कारण...

Metro (File)
Metro (File)Tendernama

पुणे (Pune) : मेट्रोने (Pune Metro) प्रवास करण्याचा तुमचा इरादा असेल तर ही बातमी आवश्यक वाचा. कारण पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे कॉलेज स्थानकांच्या (Vanaj To Garware Collage Station) दरम्यान आज (ता. २७) आणि उद्या (ता. २८) सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे मेट्रो प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Metro (File)
'या' कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; ओमप्रकाश बकोरियांची मोठी घोषणा...

सिग्नलिंग प्रणालीच्या चाचणीसाठी पुणे मेट्रोची सेवा मंगळवार (ता.२७) व बुधवार (ता.२८) डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन दरम्यान वनाज ते गरवारे कॉलेज स्थानकांच्या दरम्यान बंद राहणार आहे. दुपारी दोन नंतर मात्र या मार्गावरची सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे.

Metro (File)
नगर-मराठवाड्याने का ठोकलाय नाशिक विरुद्ध शड्डू? नेमका काय आहे वाद?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक यामार्गीकेवरील प्रवासी सेवेत कोणताही बदल होणार नाही. या मार्गावरील प्रवासी सेवा सकाळी ८ ते रात्री ८ या वेळात नेहमीप्रमाणे सुरू राहील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com