सिंहगड रोडवरील उड्डाणपुलामुळे अडचणी कमी होणार की वाढणार?

Flyover
FlyoverTendernama

पुणे (Pune) : भुयारी मार्ग, तसेच पदपथ सोडून नऊ मीटरचा सेवा रस्ता वडगाव वासियांना देण्यात यावा, तरच उड्डाणपुलाचे काम होऊ दिले जाईल, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी उड्डाणपुलाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.

Flyover
ग्रामपंचायतींना विना ई-टेंडर काम करण्याची मर्यादा पंधरा लाख रुपये

सिंहगड रस्ता भागात राजाराम पूल ते फन टाईमदरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या कामात अनेक त्रुटी आहेत. त्या त्रुटी लवकरात लवकर दूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार भीमराव तापकीर व माजी नगरसेवकांनी महापालिकेचे प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला यांच्याकडे नुकतीच केली. त्यानुसार पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागरिकांसह सर्वांनीच समस्या मांडल्या.

Flyover
औरंगाबादेत मनपा प्रशासकांचा आधी इलेक्ट्रिक बसला ब्रेक अन् आता...

उड्डाण पुलाच्या कामात जागोजागी असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून देणे, हा या पाहणी दौऱ्यात मागचा उद्देश होता. आमदार भीमराव तापकीर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी रिझन ट्रॅफिक फाउंडेशनचे अध्यक्ष आश्विन शिंदे आदी उपस्थित होते. वडगाव बुद्रूक गावात जाण्यासाठी येण्यासाठी सुवर्णनगरी तसेच दूरध्वनी कार्यालयाजवळ १८ मीटरचा डीपी रस्ता आहे. या रस्त्याला लागून चौकात भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी भिंत बांधण्यात येणार आहे. तसेच येथून मोठी वाहने चालविणे अवघड होणार आहे. वडगाव व प्रयेजा सिटीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, या सोबतच यातील सर्व त्रुटी दूर कराव्यात, मेट्रोची देखील येथेच तरतूद करण्यात यावी, अशा मागण्या आमदारांसह सर्व नगरसेवकांनी केल्या.

Flyover
अखेर पुण्यातील 'हे' स्थानक होणार मल्टिमॉडेल ट्रान्स्पोर्टेशन हब

नागरिकांनी मांडलेल्या सूचनेबाबत आयुक्त, मेट्रोचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

- श्रीनिवास बोनाला, प्रकल्प अधिकारी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com