Metro
MetroTendernama

26 जानेवारीला पुणेकरांना मिळणार मोठे गिफ्ट! कारण...

Published on

पुणे (Pune) : वनाज ते शिवाजीनगर न्यायालय आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय या मेट्रोमार्गाचे (Pune Metro) काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. मेट्रोचा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मेट्रोने प्रत्यक्ष प्रवास करता येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. पालकमंत्री पाटील यांनी आज मेट्रो, झोपडपट्टी पुनर्वसन, स्मार्ट सिटी आदी प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मेट्रोच्या बैठकीवेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, संचालक अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.

Metro
मोठी भरती; नाशिक झेडपी फेब्रुवारीत भरणार 2 हजार जागा

मार्च अखेरपर्यंत शहरात सुरू असलेल्या ३३ किलोमीटरच्या मेट्रो लाइनचे काम पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात यावे. महामेट्रोला कामाची गती वाढविण्यासाठी शासनातर्फे आवश्‍यक सहकार्य करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवालाला शासनाची मंजुरी मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

Metro
Good News! जानेवारीपासून नाशिक-बेळगाव विमानसेवा घेणार 'उडान'

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा आढावाही या वेळी घेण्यात आला. शहरात किती कामे सुरू आहेत, किती कामे पूर्ण झाली आहेत, याची माहिती घेण्यात आली. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचेही पाटील यांनी सांगितले. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. स्मार्ट सिटीचे प्रकल्प नागरिकांच्या जीवनशैलीत अधिक चांगले बदल होण्याच्यादृष्टीने उपयुक्त असून, या थीमबेस्ड प्रकल्पांना अधिक गती द्यावी, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.

Tendernama
www.tendernama.com