PUNE: पीएमपी बंद, एसटी बस सुरू; हे आहेत 'ते' 11 मार्ग

PMP
PMPTendernama

पुणे (Pune) : एसटीला पत्र दिल्यावर पीएमपी प्रशासन येत्या दोन दिवसांत ग्रामीण भागातील ११ मार्गांवरची बससेवा बंद करीत आहे. दोन दिवसानंतर एसटी प्रशासन त्या मार्गांवर एसटी सुरू करीत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

PMP
बकोरिया इफेक्ट; साडेसहा वर्षांनंतर PMPचा दैनंदिन उत्पन्नाचा विक्रम

पीएमपी प्रशासनाने आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यासोबतच तोटा कमी करण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे कमी प्रतिसाद असलेल्या ग्रामीण भागातील ४० मार्गांवरच्या सुमारे १२०० फेऱ्या बंद करण्याचा निर्णय ‘पीएमपी’ने घेतला. मागच्या आठवड्यातच त्या विषयीचे पत्र एसटी प्रशासनाला दिले, ते पत्र प्राप्त होताच एसटी प्रशासनाने ४० पैकी ११ मार्गांवर सेवा सुरू करण्याचे मान्य केले. मात्र, उर्वरित २९ मार्गांवर सेवा सुरू करणार नसल्याचे ‘पीएमपी’ला कळविले आहे.

PMP
मोठी भरती; नाशिक झेडपी फेब्रुवारीत भरणार 2 हजार जागा

पीएमपीने ग्रामीण भागात सुरू केलेल्या फेऱ्या या तोट्यात असल्याकारणाने प्रशासनाने हे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. या चाळीस मार्गांवरच्या दररोज सुमारे १२०० फेऱ्या होत. प्रवासी असले, तरीही उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक आहे. या मार्गावर पीएमपीच्या एक फेरीतून सुमारे १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, त्यासाठी पीएमपीला ३० हजारांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे ‘पीएमपी’च्या तोट्यात वाढ होत राहिली.

PMP
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड मार्गाच्या मोजणीला पर्यावरणचा रेड सिग्नल?

कोरोनाकाळात पीएमपीच्या शहरातील वाहतुकीवर मर्यादा आल्या. घटणारे प्रवासी उत्पन्न लक्षात घेता पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागात सेवा सुरू केली. मात्र, तो प्रयत्नदेखील फसला. शिवाय, ग्रामीण भागात एसटीने सेवा देणे व्यवहार्य असल्याकारणाने पीएमपीने आता ग्रामीण भागात एसटीने सेवा सुरू करावी म्हणून एसटीला पत्र दिले.

PMP
कोथरूडकरांना मोठा दिलासा; लॉ कॉलेज रोडला मिळणार नवा पर्याय

ज्या ११ मार्गांवर एसटीची सेवा सुरू होत आहे. त्या मार्गावर दोन दिवसांत पीएमपी बससेवा बंद करीत आहे. उर्वरित २९ मार्गांवर एसटीने सेवा सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.
- दत्तात्रेय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

आम्ही केवळ ग्रामीण भागातील ११ मार्ग सुरू करीत आहोत. उर्वरित २९ मार्ग हे शहरातून जात असल्याने त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, त्यामुळे आम्ही त्या मार्गावर सेवा सुरू करणार नाही.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे विभाग

PMP
निफाडला ड्रायपोर्टऐवजी होणार मल्टी मॉडल हब; ५०० कोटींचा डीपीआर

पीएमपीचे बंद होणारे ११ मार्ग
सासवड - यवत
स्वारगेट - कशिंगगाव
सासवड - उरुळी कांचन
स्वारगेट - बेलावडे
स्वारगेट - खारावडे
स्वारगेट - मोरगाव
चाकण - शिक्रापूर
वाघोली - राहू
कापूरहोळ - सासवड
स्वारगेट - विंझर वेल्हा
स्वारगेट - जेजुरी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com