चांदणी चौकातील अतिक्रमणावरून महापालिका - NHAI मध्ये जुंपली

Chandni Chowk
Chandni ChowkTendernama
Published on

पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandni Chowk) उड्डाण पूल प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेवरील अतिक्रमण कोणी काढायचे, यावरून महापालिका (PMC) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात (NHAI) तू-तू मै-मै सुरू झाले आहे. परिणामी अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत आहे.

Chandni Chowk
मोठी भरती; नाशिक झेडपी फेब्रुवारीत भरणार 2 हजार जागा

बावधन खुर्द मधील स. नं. ५९ मधील जागा महापालिकेने रस्त्याच्या कामासाठी जागामालकांला मोबदला देऊन ताब्यात घेतली. त्यानंतर ही जागा महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात आली. प्राधिकरणाने रस्ता केल्यानंतर उरलेल्या जागेवर पत्रे लावून त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. यासंदर्भात अनेकांनी तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई झालेली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

Chandni Chowk
निफाडला ड्रायपोर्टऐवजी होणार मल्टी मॉडल हब; ५०० कोटींचा डीपीआर

या जागेवर असलेला नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद करत तेथे लोखंडी गर्डर व पत्रे लावून अतिक्रमण करण्यात आले आहे. यासंदर्भात कागदपत्रांसह वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप प्रकल्प बाधित व्यावसायिक राजेंद्र झुरंगे यांनी केला.
झुरंगे म्हणाले की, अनेक बेकायदेशीर-नियमबाह्य बांधकामाबाबत अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे यासंदर्भात वारंवार तक्रार केली. परंतु आमच्यासमोर जे तोंडी आदेश दिले गेले त्याचे पालन झालेले दिसलेच नाही. ऑनलाइन तक्रार केल्यावर दखल घेतली जाईल असे वाटले परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. चांदणी चौकात अप ॲण्ड अबोव्ह हॉटेल जवळून पौडरस्त्याकडे जातानाच्या वळणावर जो फ्लेक्स लावला आहे, त्याचा काही धोकादायक भाग महापालिकेने खरेदी केलेल्या जागेत आहे.

Chandni Chowk
कोथरूडकरांना मोठा दिलासा; लॉ कॉलेज रोडला मिळणार नवा पर्याय

याबाबत महापालिकेचे संबंधित अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, जमीन संपादित करून देणे हे आमचे काम होते. ते काम आम्ही केले. आता यापुढील जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाची आहे. तसेच या जागेत अतिक्रमण झाले असल्यास तो विषय बांधकाम विभागाचा आहे. आमच्याशी त्याचा संबंध नाही.
महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी संजय कदम उपलब्ध झाले नाहीत. त्यांना मेसेज व व्हॉटसअप मेसेज पाठविण्यात आले. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Chandni Chowk
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड मार्गाच्या मोजणीला पर्यावरणचा रेड सिग्नल?

सर्व्हे क्रमांक ५९ या जागेत पत्रे लावण्यात येऊन अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांना नोटीस देवून हे अतिक्रमण हटविण्यात येईल.
- भारत तोडकरी, प्रकल्प सल्लागार, चांदणी चौक उड्डाण पूल

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com