पुण्यातील 'या' 60 चौकांचा होणार मेकओव्हर

PMC
PMCTendernama

पुणे (Pune) : पुढील वर्षाच्या सुरवातीस होणाऱ्या ‘जी २०’ देशांच्या (G 20) बैठकीसाठी पुणे शहरातील प्रमुख ६० चौकांचे सुशोभीकरण खासगी बांधकाम व्यावसायिक व संस्थांच्या (Private Contractors) मदतीने केले जाणार आहे. २५ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याबरोबरच पुढील पाच वर्षे त्यांची देखभाल दुरुस्तीदेखील संबंधित व्यावसायिक करणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती बुधवारी दिली.

PMC
फडणवीसजी, ७५ हजार सोडाच पण तुमच्या नागपुरातच १८९ नोकऱ्या धोक्यात

आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बांधकाम व्यावसायिक आणि संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक बुधवारी झाली. आर्थिकदृष्ट्या प्रगत २० देशांचे अर्थमंत्री व त्या देशांच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांची ‘जी २०’ ही संघटना आहे. या संघटनेची वर्षातून एकदा बैठक होते. त्यात हे सर्व मंत्री व गव्हर्नर सहभागी होतात. यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रश्‍न, सद्यःस्थिती, भविष्यातील वाटचाल यावर चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतले जातात. भारत २०२३ मधील ‘जी २०’ परिषदेचा यजमान असून, या परिषदेतील २१३ बैठकींपैकी १३ बैठका महाराष्ट्रात होणार आहेत. मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या तीन शहरांमध्ये या बैठका होतील. दरम्यान मंगळवारी केंद्रीय पथकाने पुण्याला भेट देऊन परिषदेच्या दृष्टीने सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेऊन काही सूचना केल्या.

PMC
मिहान प्रकल्प झाला पोस्टाचा डब्बा; अनेक कंपन्यांनी केला ‘टाटा‘

‘जी २०’ परिषदेच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारने मुंबई, पुणे व औरंगाबाद महापालिका शहराचे सौंदर्यीकरण व स्वच्छतेसंदर्भात सूचना दिल्या आहेत. या परिषदेसाठी २० देशांचे २०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हे प्रतिनिधी शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व इतर पर्यटन स्थळांना भेट देण्याचीही शक्यता आहे. त्यानुसार शहराचे सुशोभीकरण केले जाणार आहे, असेही आयुक्त म्हणाले.

PMC
पुणेकरांसाठी गुड न्यूज; लवकरच निघणार रिंगरोडचे टेंडर

शहरातील ६० चौकांचे खासगी संस्था, बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून सुशोभीकरणाच्या प्रस्तावाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर करून चौकांचे, पदपथांचे सुशोभीकरण केले जाईल. काही व्यावसायिकांनी त्याबाबतचा आराखडाही सादर केला आहे. काही व्यावसायिक दोन, तीन किंवा पाच चौकांचेही सुशोभीकरण करणार आहेत. सुशोभीकरणाबरोबर त्याचे पुढील पाच वर्षांची देखभाल दुरुस्तीही संबंधित व्यावसायिक करतील. यामध्ये १८ बाय २४ इंच आकारात त्यांना स्वतःचे नाव वापरण्याची मुभा देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

PMC
नगर रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा अॅक्शन प्लॅन; थेट..

या ठिकाणी होणार सुशोभीकरण

नगर रस्ता, येरवडा, विमाननगर, खराडी, विश्रांतवाडी, मुंढवा, हडपसर, वानवडी, फुरसुंगी, कोंढवा, खडी मशिन, स्वारगेट परिसर, कात्रज, नवले पूल, वडगाव चौक, पौड रस्ता, कर्वे रस्ता, बाणेर, सातारा रस्ता, वारजे, धायरी, महंमदवाडी या भागातील ६० चौकांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com