ST म्हणतेय निर्णय झाला; मेट्रो म्हणतेय माहित नाही बुवा!

ST Bus Stand - MSRTC
ST Bus Stand - MSRTCTendernama

पुणे (Pune) : शिवाजीनगर बसस्थानकाबाबत (Shivajinagar ST Bus Stand) निर्णय घेण्यासाठी बुधवारी राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) आणि मेट्रो (Metro) प्रशासन यांच्यात मुंबईमध्ये (Mumbai) बैठक झाली. या वेळी शिवाजीनगर बसस्थानक मूळ जागीच ठेवण्याचा तसेच त्याच्या उभारणीचा खर्च दोन्ही प्रशासनाने मिळून करण्याचा निर्णय झाला. यासाठी सुमारे ४५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच येथे १० मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारण्याचाही निर्णय झाल्याचे एसटीच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे शिवाजीनगर बसस्थानाबाबत निर्णय झाल्याचे एसटीचे अधिकारी सांगत असले तरी मेट्रोने मात्र ठोस निर्णय झाला नसल्याचे म्हणत संभ्रम कायम ठेवला आहे.

ST Bus Stand - MSRTC
नाशिक झेडपीच्या ढिसाळ कारभारामुळे वित्त आयोगाचे 326 कोटी अखर्चित

शिवाजीनगर येथील मेट्रोच्या भूमिगत स्थानकासाठी शिवाजीनगर बसस्थानकाचे वाकडेवाडी येथे स्थलांतर करण्यात आले. त्यावेळी शिवाजीनगर बसस्थानक पाडण्यात आले. आता मेट्रोचे काम झाले. परंतु बसस्थानक कोण बांधणार यावरून मेट्रो प्रशासन व एसटी प्रशासन यांच्यात वाद सुरू झाले. परिणामी, वाकडेवाडी बसस्थानकाचा मुक्काम वाढला. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

ST Bus Stand - MSRTC
'नाशिक-मुंबई महामार्ग खड्डेमुक्त होईपर्यंत टोल वसुली थांबवा'

शिवाजीनगर बसस्थानकाच्या पूर्वीच्याच जागीच नवे बसस्थानक उभारण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या ठिकाणी होणाऱ्या मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्टेशन हबमुळे प्रवाशांना येथूनच एसटी, मेट्रो व रेल्वेने प्रवास करणे सोपे होणार आहे. त्याचा खर्च हा मेट्रो आणि एसटी प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत एसटीकडून दुजोरा मिळाला असला, तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ST Bus Stand - MSRTC
पुणेकरांसाठी गुड न्यूज; लवकरच निघणार रिंगरोडचे टेंडर

१० मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्स

शिवाजीनगर बसस्थानक हे मूळ जागीच राहणार आहे. तो उभारण्याचा खर्च दोन्ही प्रशासन एकत्रितरीत्या करणार आहेत. या जागेवरच १० मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्सदेखील बांधण्यात येणार आहे. यासाठी शशी प्रभू ही कन्सल्टन्सी नेमली असून, दोन आठवड्यांत शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेची पाहणी करून अहवाल देण्यात येणार आहे. तळमजल्यावर बसस्थानक असेल. वरच्या मजल्यावर पार्किंग व चार्जिंग स्टेशन उभारले जाईल. उर्वरित मजल्यांचा व्यावसायिक वापर होईल.

ST Bus Stand - MSRTC
रिंगरोडचे भूसंपादन ३० दिवसांत संपवा; मोपलवारांनंतर कलेक्टरचे आदेश

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने शिवाजीनगर बसस्थानकासह वाकडेवाडी बसस्थानकही तसाच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाकडेवाडीची ‘आरे’ची जागा एसटी प्रशासनालाच मिळावी, यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. वाकडेवाडीची जागा मिळाल्यास त्याठिकाणी बसस्थानक किंवा डेपो उभारण्याची एसटी प्रशासनाची योजना आहे.

ST Bus Stand - MSRTC
नाशिक ZPत एवढ्या सुशिक्षित बेरोजगारांचा ठेकेदारी परवान्यासाठी अर्ज

मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. शिवाजीनगरचे बसस्थानक हे पूर्वीच्याच जागी उभारले जाणार आहे. यासाठी कन्सल्टन्सी नेमली असून, येत्या १५ दिवसांत याबाबतचा अहवाल देण्यास सांगितले आहे.

- शेखर चन्ने, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

ST Bus Stand - MSRTC
कल्याण-डोंबिवलीत 'त्या' ४० बिल्डरांभोवती फास आवळला;बँक खाती गोठवली

एसटी प्रशासनासोबत बैठक झाली. विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र काही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आताच यावर अधिक काही बोलता येणार नाही.

- हेमंत सोनवणे, सरव्यवस्थापक, मेट्रो

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com