पुणेकरांसाठी 1,604 घरांची लॉटरी; अर्ज करण्यास 4 दिवसांची मुदतवाढ

PM Awas
PM AwasTendernama

पुणे (Pune) : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत (PM Awas Yojna) आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) आणि अल्प उत्पन्न गटातील (LIG) नागरिकांसाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) काढण्यात आलेल्या सुमारे एक हजार ६०४ घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यास चार दिवसांचा कालावधी राहिला असून नागरिकांनी मुदत संपण्यापूर्वी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

PM Awas
पुणेकरांसाठी गुड न्यूज; लवकरच निघणार रिंगरोडचे टेंडर

निगडी प्राधिकरण हद्दीतील पेठ क्रमांक १२ (मोशी) येथील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गींसाठीच्या ३१ सदनिका आणि अल्प उत्पन्न गटातील ८२४ सदनिका आहेत. तर पेठ क्रमांक ३० आणि ३२ (वाल्हेकरवाडी) येथे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठीच्या ३६६ आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्यासाठी ४१४ सदनिका आहेत. मोशी येथील डब्लूएस गटातील सदनिका या २९.५५ चौरस मीटरच्या असून त्यांची किमत सात लाख ४० हजार रुपये इतकी निश्‍चित करण्यात आली आहे. तर एलआयजी गटातील सदनिका या ५९.५७ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या असून ३२ लाख रुपये निश्‍चित करण्यात आली आहे.

PM Awas
IMPACT: औरंगाबाद रेल्वे स्थानकावर 8 दिवसांत मिळणार स्वस्तात पाणी

वाल्हेकरवाडी येथील इब्लूएस गटातील सदनिका या २५.५२ चौरस मीटरच्या असून त्यांची किंमत १८ लाख ८० हजार ८२४ रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. तर एलआयजी गटासाठीच्या सदनिका या ३४.५७ मीटर असून २५ लाख ४७ हजार ८०९ रुपये अशी किमत निश्‍चित करण्यात आली आहे. पीएमआरडीएकडून नागरीकांना ऑनलाइन अर्ज भरण्यास पंधरा दिवसांची मुदत वाढ देण्यात आली होती. ही मुदत ३ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे नागरीकांनी मुदतीपूर्वी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन पीएमआरडीएने केले आहे. www.pmrda.gov.in अथवा http://www.lottery.pmrda.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करता येईल, असेही पीएमआरडीएने कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com