शिंदे साहेब, जरा आमच्याकडेही लक्ष द्या..?

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

पुणे (Pune) : वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला स्थलांतरित झाला. मात्र यानिमित्ताने एमआयडीसीच्या तळेगाव-चाकण औद्योगिक पट्ट्यातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. कोट्यवधींचा महसूल सरकारला देणाऱ्या आणि लाखो हातांचा रोजगार असणाऱ्या लघु, मध्यम आणि अवजड उद्योग क्षेत्रालाच सुविधांची वानवा आहे. अखंडित वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांसाठी साऱ्यांना झगडावे लागत आहे.

Eknath Shinde
शिंदे-फडणवीसांना गुजरातने चुना लावला; 'हा' मोठा प्रकल्पही पळवला

स्थानिकांचा विरोध, इतर राज्यांच्या तुलनेत भरमसाठ वीजेचे दर, एमआयडीसी प्रशासनातील खाबुगिरी आणि सुविधांची वानवा यामुळे महाराष्ट्रातील अनेक उद्योग यापूर्वीही इतर राज्यांत स्थलांतरित झाले आहेत. आता सरकारच्या अनास्थेपायी वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. याला पोटभरू एमआयडीसी प्रशासन आणि उद्योजकांना सापत्नभावाची वागणूक देणारे सरकारच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया तळेगाव-चाकण एमआयडीसीतील बहुतांश उद्योजकांनी दिली. डॉलरमधील परकीय चलनाच्या नुसत्या अवास्तव घोषणा करून, सरकार प्रस्थापित लघु, मध्यम उद्योजकांच्या समस्यांकडे मात्र दुर्लक्ष करते. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजीची भावना आहे.

Eknath Shinde
नाशकात मुंबई-आग्रा महामार्गावर दिवाळी पूर्वीच दिवाळी; 9 कोटींचा...

उद्योजकांच्या सेवा, सहकार्यासाठी सदा तत्पर असलेल्या इतर राज्यांतील औद्योगिक विकास मंडळांशी तुलना करता एमआयडीसी प्रशासन उद्योजकांना किरकोळ कामांसाठी खेटे घालावयास लावते. एमआयडीसी कार्यालयात दलाल आणि एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. परवानग्या आणि भूखंड मिळविण्यासाठी उद्योजकांना आपली कामे सोडून अधिकारी, एजंटांचे पाय धरावे लागतात. उद्योजकांच्या सोयीसाठी आणि सुलभ प्रशासकीय कामकाजासाठी चिंचवड तसेच वाकडेवाडी येथील एमआयडीसी प्रशासनाची कार्यालये तळेगाव अथवा चाकण औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित करावीत, अशी मागणी जोर धरते आहे. तळेगाव-चाकण रस्त्यावरील नित्याच्या वाहतूक कोंडीवर पर्याय उपाय म्हणून खालुंब्रे ते खराबवाडी दरम्यानचा रस्ता एमआयडीसी प्रशासनाने विकसित करावा, अशी उद्योजकांची मागणी आहे.

Eknath Shinde
'या' वादग्रस्त कंपनीवर शिंदे-फडणवीस मेहरबान का? २० कोटींच्या...

एमआयडीसीतील समस्या

-अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

- मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना

- तळेगाव-चाकण रस्त्यावरील नित्याची वाहतूक कोंडी

- वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा

- वाहनतळाअभावी रस्त्यावर अवजड वाहनांचे पार्किंग

- स्थानिक कंत्राटदार आणि गावगुंडांचा त्रास

- एमआयडीसी प्रशासनाकडे घालावे लागणारे खेटे

- कौशल्य विकास केंद्राअभावी कुशल मनुष्यबळाची कमतरता

Eknath Shinde
'त्या' अद्भुत ढगात असलेल्या पुलाचे काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत खुला

डाऊ केमिकल आणि हिरानंदानी यांचे प्रकल्प पर्यावरणासाठी धोकादायक असल्याने या प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध अपेक्षित होता. मात्र, वेदांता-फॉक्सकॉनसारख्या प्रकल्पांसाठी स्थानिक भूमिपुत्र स्वागतोत्सुक होते.

- दत्तात्रेय पडवळ, माजी सरपंच, नवलाख उंबरे, मावळ

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com